रविवावरच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माची तब्येत बिघडल्याने त्याला इम्पॅक्ट खेळाडूंच्या यादीत ठेवले गेल. प्रथम गोलंदाजी करतणाऱ्या मुंबईचा फिरकीपटू ऋतिक शौकीन याने केकेआरचा कर्णधार नितीश राणा याच्याशी वाद घातल्याचे पाहायला मिळाले.
केकेआने नाणेफेक गमावल्यानंतर नितीश राणा (Nitish Rana) याच्या नेतृत्वातील संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. केकेआरने पावरप्ले दरम्यान नारायन जगदीसन आणि रहमन्नुल्हा गुरबाझ (Rahmanullah Gurbaz) यांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार नितीश राणा याने डावातील 9व्या षटकात विकेट गमावली. मुंबईचा युवा फिरकीपटू ऋतिक शौकीन (Hrithik Shokeen) या षटकात गोलंदाजीला आला होता. षटकातील पहिलाच चेंडू राणाने षटकारासाठी खेळला. पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. रामदीप सिंग याच्या हातात तो झेलबाद झाला. विकेट गमावल्यानंतर राणा आणि शौकीन यांच्यात खेळपट्टीवर शाब्दीक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शौकीनच्या बोलण्यावरून हा वाद सुरू झाला, असेच व्हिडिओत दिसते.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1647553341004877824?s=20
https://twitter.com/777_rancho/status/1647554314435715073?s=20
https://twitter.com/TheRaghavvvv/status/1647555019007479809?s=20
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पोट दुखत असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारने नाणेफेक केली आणि जिंकली देखील. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागच्या दोन हंगामांपासून मुंबई संघासोबत सराव करत आहे. दीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर रविवारी अखेर अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली.
केकेआरसाठी सलामीला आलेले रहमनुल्लाह गुरबाज, आणि नारायन जगदीसन यांनी अनुक्रमे 8 आणि शुन्य धावा करून विकेट्स गमावल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राणामे 10 चेंडूत 5 धावा केल्या आणि विकेट गमावली. एकीकडे केकेआर झटपट विकेट्स गमावत असताना दुसरी बाजू वेंकटेश अय्यर याने सांभाळून ठेवली. अय्यरने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर 49 चेंडूत शतक साकारले. (Nitish Rana-Hrithik Shoukin dispute is a topic of discussion on social media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING: अखेर 3 वर्षांनंतर सचिनच्या अर्जुनचे आयपीएल पदार्पण! केकेआरविरूद्ध मिळाली प्लेइंग 11 मध्ये संधी
MIvsKKR । टॉस जिंकून सूर्यकुमारचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, रोहितच्या अनुपस्थितीत अर्जुनला मिळाली संधी
https://twitter.com/777_rancho/status/1647554314435715073?s=20