आयपीएल 2023 हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स शनिवारी (8 एप्रिल) खेळणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे. झाय रिचर्डसन दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू हंगामात खेळत नाहीये. मुंबईने रिचर्डसनच्या बदली खेळाडूच्या रूपात रिले मेरेडिथला संघात घेतले आहे.
झाय रिचर्डसन (Jhye Richardson) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे यावर्षी आयपीएल खेळू शकणार नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला पुढचा मोठा काळ लागू शकतो. रिले मेरेडिथ (Riley Meredith) याने यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये मेरिडिथने 13 सामन्यांमध्ये 33.75च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत. 1.3 कोटी रुपये खर्च करून मुंबईने मेरेडिथला संघात सामील केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरेडिथने 5 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 8 विकेट्स घेतल्या.
We are ???????????????????? excited to announce the return of Australian quickster, ???????????????????????????????? ???? to #MumbaiIndians ????
He will join as a replacement for Jhye Richardson for the remainder of the season. Read more????https://t.co/taZdqgbF4i#OneFamily #MumbaiMeriJaan #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/3NICdKUPB6
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2023
झाय रिचर्डसनला जानेवारी महिन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. दरम्यानच्या काळात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली. त्याने आपला शेवटचा सामना बीग बॅश लीगमध्ये स्केचर्ससाठी 4 जानेवारी रोजी थंडर्स संघाविरुद्ध खेलला. तेव्हापासून मागच्या ती महिन्यांमध्ये रिचर्डसन क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. रिचर्डसनने आयपीएल हंगामातून माघार घेतल्यानंतर मुंबईसाठी हा दुसरा मोढा धक्का होता. कारण संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतीमुळे आयपीएल खेळत नाहीये. सध्या बुमराहच्या जागी संदीप वॉरिअर सध्या मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे.
मुंबई इंडियन्सने चालू आयपीएल हंगामात अद्याप फक्त एकच सामना खेळला आहे. पहिल्या सामन्यात मुंबईसमोर आरसीबीचे आव्हान होते. रविवारी (2 एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने 7 बाद 171 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने अवघ्या 16.2 षटकात हे लक्ष्य गाठले. मुंबईला आपला दुसरा सामना 8 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. (Mumbai Indians have replaced Jhye Richardson with Riley Meredith)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुनील नारायणचा भीमपराक्रम! बनला KKRसाठी ‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
विराटचा विक्रम मोडणार ऋतुराज गायकवाड? आयपीएलवर एकहाती सत्ता मिळवण्याची संधी






