इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या गुजरात टायटन्स संघाला मंगळवारी (दि. 2 मे) 44व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा धक्का बसला. दिल्लीने या सामन्यात गुजरातला 5 धावांनी पराभूत केले. मात्र, या सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने उच्च दर्जाची गोलंदाजी केली. शमीने पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी करत खास विक्रम नावावर केला. याबाबत त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शमी म्हणाला की, तो त्याच्या योजनेवर कायम राहतो. याव्यतिरिक्त त्याने असेही म्हटले की, हे आव्हान पार करता आले असते.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी केली. तसेच, आपल्या संघाला शानदार सुरुवात करून दिली. शमीने पॉवरप्लेमध्ये 7 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, दिल्लीची मधली फळी उद्ध्वस्त केली. त्यामुळे गुजरात टायटन्स संघ पराभूत होऊनही शमीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
‘हे आव्हान पार केले जाऊ शकत होते’
गुजरात संघाला मिळालेल्या पराभवानंतर मोहम्मद शमी याने त्याच्या गोलंदाजी आणि संघाच्या आव्हान पार न करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी माझ्या योजनेवर काम करण्याचा प्रयत्न करतो. लाईन आणि लेंथवर लक्ष देतो. हे आव्हान पार तितके जास्त नव्हते की, धावा होऊ शकणार नाहीत. चेंडू स्विंगही होत नव्हता. माझा हा विश्वास आहे की, आम्ही हे आव्हान पार केले पाहिजे होते. आम्ही सातत्याने नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिलो. आम्हाला भागीदारीची आवश्यकता होती आणि ती खूप नंतर झाली. मात्र, आता काही सामने उरले आहेत आणि अशा गोष्टी खेळात होत राहतात.”
आयपीएल 2023 स्पर्धेच्या 44व्या सामन्यात दिल्लीने गुजरातला 5 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 130 धावा केल्या होत्या. मात्र, तरीही संघाने शानदार पद्धतीने या आव्हानाचा बचाव केला. तसेच, गुजरातला 125 धावांवर रोखले. (ipl 2023 pacer mohammad shami reacts on his bowling spell vs delhi capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने खरंच नवीनला दाखवला बूट? व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
‘आम्हीही बाचाबाची करायचो, पण हे असलं…’, गंभीर-विराट प्रकरणावर गावसकरांची कडक शिक्षेची मागणी






