शुक्रवारी (18 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 66 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कामय ठेवण्यासाठी दोन्ही संघांकडे असलेली ही शेवटची संधी होती. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 5 बाद 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने हे लक्ष्य 19.4 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. पराभवानंतर पंजाबचे प्लेऑफ शर्यतीतल आव्हान संपुष्टात आले.
राजस्थान रॉयल्सला या सामन्यात विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानन 19.4 षटकांमध्ये 189 धावा केल्या आणि सामन जिंकला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 9 धावा हव्या होत्या. ध्रुव जुरेल आणि ट्रेंट बोल्ड हे दोन्ही फलंदाज नुकतेच खेळपट्टीवर आले होते. समोर होता फिरकीपटू राहुल चाहर. पहिल्या तीन चेंडूंवर जुरेलने संघासाठी चार धावा केल्या. षटकातील चौथा चेंडूत जुरेलने जबरदस्त षटकार मारला आणि राजस्थानलासामना जिंकवून दिला.
राजस्थानसाठी सलामीवीर जयशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा चमकला. जयस्वालने चालू आयपीएल हंगामातील आपले आठवे अर्धशतक शुक्रवारी (19 मे) साकार केले. त्याने 36 चेंडूत 50 धावा करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलने 30 चेंडूत 51 धावांची खेळी केली. शिमरन हेटमायरने शेवटच्या षटकांमध्ये दिलेले योगदान सामना जिंकण्यासाठी महत्वाचे ठरले. मात्र, संघ विजयापासून 9 धावा दूर असताना हेटमायरल झेलबाद झाला आणि राजस्थान संघ अडचणीत सावडला.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यामुळे पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागली. पंजाबने आपल्या डावातील 20 षटकांमध्ये 5 बाद 187 धावा केल्या. यात सॅम करून, जितेश शर्मा आणि एम शाहरुख कान यांचे योगदान सर्वाधिक होते. तिघांनी अनुक्रमे 49*, 44 आणि 41* असे प्रदर्शन केले. गोलंदाजी विभागात नवदीप सैनी याने 4 षटकात 40 धावा खर्च केल्या, पण सोबतच सर्वाधिक तीन विकेट्स देखील घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि ऍडम झंम्पा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पंजाबसाठी कॅमरून ग्रीन याने दोन विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, अर्शदीप सिंग, नाथन एलिस आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
प्लेऑफचे समिकरण पाहता, राजस्थान रॉयल्स अजनबी स्पर्धेत आहे. पण पंजाबचे आव्हान संपुष्टात आले आहे. गुणातालिकेत राजस्थान सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर घसरली आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना लीग स्टेजमधील अजून प्रत्येकी एक-एक सामना खेळायचा आहे. दुसरीकडे राजस्थानने मात्र आपले सर्व सामने खेळले आहेत. अशात राजस्थानचे प्लेऑफ तिकिट इतर संघांच्या प्रदर्शनावर अवलंबून असणार आहे. (Punjab Kings out of the group stage for the 9th consecutive season in IPL.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO । आपल्याच चेंडूवर बोल्टने पकडला अप्रतिम झेल, शतकवीर फलंदाज स्वस्तात बाद
इंग्लिश दिग्गज म्हणतोय, “विराटपेक्षा क्लासेनचे शतक सरस”, दिले हे कारण