– अनिल भोईर
आयपीएलच्या साखळी सामन्याचा शेवटचा आठवडा सोमवारपासून (15 मे) सुरू होत असून 9 सामने उरले शिल्लक आहेत. मात्र अजून ही एकही संघ अधिकृतपणे प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरला नाही. बघूया कशी आहेत समीकरणे.
गुजरात टायटन्स- गुजरात टायटन्स संघाला प्ले-ऑफ्स मध्ये पात्र होण्यासाठी किमान 1 विजय आवश्यक आहे. एखादा सामना रद्द झाला तरी ते पात्र होतील. दोन पराभव झाल्यास नेट रनरेटच्या आधारावरही ते पात्र होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती बघता जवळपास गुजरात संघ पात्र ठरला आहे.
उर्वरित सामने- सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी-
चेन्नई सुपर किंग्स- सीएसकेचा एक सामना शिल्लक असून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणारा सामना जिंकणे त्यांना अनिवार्य आहे. पराभव झाल्यास त्यांना प्ले-ऑफ्ससाठी इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.
उर्वरित सामना- दिल्ली कॅपिटल्स
मुंबई इंडियन्स- मुंबई इंडियन्स संघाला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. एक विजय, एक पराभव झाल्यास आरसीबी व पंजाब किंग्स संघाचा 1 पराभव होणे आवश्यक असेल. कारण तिन्ही संघ 16 गुणांवर राहिल्यास मुंबई संघाला नेट रन रेटचा फटका बसण्याची शक्यता असेल.
उर्वरित सामने- लखनऊ सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद
लखनऊ सुपरजायंट्स- लखनऊ सुपरजायंट्स संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकून थेट प्ले-ऑफ्स ध्ये जाता येईल. मात्र एक पराभव झाल्यास 15 गुणांवर पात्र होण्यासाठी आरसीबी व पंजाब या संघाचा 1 पराभव होणे आवश्यक असेल.
उर्वरित सामने – मुंबई इंडियन्स, केकेआर
आरसीबी- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकून 16 गुणांवर जाणे अनिवार्य आहे. 16 गुणांवर नेट रनरेटच्या आधारे पात्र होण्याची शक्यता आहे किंवा मुंबई, लखनऊ व पंजाब या संघाचा एक पराभव झाल्यास ते 16 गुणांवर पात्र होतील.
उर्वरित सामने- सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स
पंजाब किंग्स- पंजाब किंग्स संघाला उर्वरित दोन्ही सामने जिंकून 16 गुणांवर जाणे अनिवार्य आहे. त्याच सोबत मुंबई इंडियन्स, लखनऊ व आरसीबी या संघाचा एक पराभव झाल्यास 16 गुणांवर पात्र होतील. किंवा दोन्ही सामने जिंकताना नेट रन रेट चांगला करून पात्र होण्यासाठी नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.
उर्वरित सामने- दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद हैदराबाद संघांची प्ले-ऑफ्समध्ये पात्र होण्याची शक्यता कमी आहेत. तिन्ही संघांना आपले उर्वरित सामने जिंकून 14 गुणांवर जाता येईल मात्र त्यानंतरही मुंबई, लखनऊ, आरसीबी व पंजाब संघाचे पराभव होणे आवश्यक असेल. त्यानंतर ही नेट रनरेटवर अवलंबून रहावे लागेल. त्यामुळे यांची पुढे जाण्याची कमीच आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतुन अधिकृतपणे याआधीच बाहेर गेला आहे.
(IPL 2023 Play Offs Equation Still 6 Teams In Contention)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
VIDEO:..आणि गावसकरांनी शर्टवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, पाहा आयपीएलमधील सर्वात भावनिक क्षण
धोनीने चेन्नईत खेळला अखेरचा सामना? चेपॉकवर फेरी मारत चाहत्यांना म्हणाला, “थॅन्कू”, पाहा व्हिडिओ