इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला थाटात सुरुवात झाली. 31 मार्चपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील 6 सामने पार पडले आहेत. सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. हा सामना चेन्नईने 12 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर आयपीएल 2023 पॉइंट्स टेबल बदलला आहे. त्याचबरोबरी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप यादीतही बदल झाला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएल 2023 पॉइंट्स टेबल
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Chennai Super Kings vs Lucknow Super Giants) सामन्यानंतर आयपीएल 2023 पॉइंट्स टेबल (IPL 2023 Points Table) यादीत मोठा बदल झाला. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या दोनपैकी एक सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले. तसेच, लखनऊ संघ तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. लखनऊने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला 50 धावांनी पराभूत केले होते. याव्यतिरिक्त अव्वलस्थानी राजस्थान रॉयल्स, दुसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चौथ्या स्थानी गुजरात टायटन्स आणि पाचव्या स्थानी पंजाब किंग्स आहे. पहिल्या सहा संघांचे प्रत्येकी 2 गुण आहेत.
https://twitter.com/IPL/status/1642959172424863747
ऑरेंज कॅप
आयपीएल 2023मधील सहा सामन्यांनंतरही ऑरेंज कॅप (Orange Cap) चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याकडेच आहे. त्याने पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध 92 धावांची खेळी, तर दुसऱ्या सामन्यात लखनऊविरुद्ध 57 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे तो 149 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी लखनऊचा काईल मेयर्स (Kyle Mayers) असून त्याच्या 126 धावा आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी तिलक वर्मा (84), चौथ्या स्थानी विराट कोहली (82) आणि पाचव्या स्थानी फाफ डू प्लेसिस (73) आहे.
पर्पल कॅप
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) याने 2 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, पर्पल कॅप (Purple Cap) आपल्या नावावर केली आहे. या शर्यतीत रवी बिश्नोई हादेखील शर्यतीत आला आहे. त्याने 2 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, युझवेंद्र चहल आणि मोईन अली संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी असून त्यांच्या प्रत्येकी 4 विकेट्स आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी अर्शदीप सिंग असून त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 2023मधील सातवा सामना
आयपीएल 2023 स्पर्धेतील सातवा सामना मंगळवारी (दि. 4 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (ipl 2023 points table orange and purple cap list updated after 6th match know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी का हसू, मी तर गंभीर आहे’, धोनीने गगनचुंबी षटकार मारताच उतरलं गौतमचं तोंड; नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल
विजयानंतर धोनीने दिली कर्णधारपद सोडण्याची धमकी! गोलंदाजांवर ठेवली वॉर्निंगची टांगती तलवार





