---Advertisement---

पावसाने बिघडवला केकेआरचा खेळ! पंजाबची डकवर्थ-लुईस नियमामुळे 7 धावांनी विजयी सलामी

On: शनिवार, एप्रिल 1, 2023 8:08 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दिवसातील पहिला सामना 3.30 वाजता मोहाली येथे पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. काहीशा रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेर पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे शेवटी पंजाब संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

 

मोहाली येथील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातून रहमानुल्ला गुरबाज याने केकेआरसाठी तर सिकंदर रझा याने पंजाबसाठी पुनरागमन केले. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पंजाबसाठी युवा सलामीवीर प्रभसिमरन गिल याने आक्रमक 23 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षेने वेगवान फलंदाजी करताना 32 चेंडूंवर 50 धावांची खेळी केली. कर्णधार शिखर धवनने 40, जितेश शर्माने 21, रझाने 16 व करनने नाबाद 26 धावा करून संघाला 5 बाद 191 अशी मजल मारून दिली. केकेआरसाठी साऊदीने 2 बळी टिपले.

विजयासाठी मिळालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात मनदीप सिंग व अनुकूल रॉय हे बाद झाले. त्यांना अर्शदीप सिंगने तंबूचा रस्ता दाखवला. पहिला षटकापासून आक्रमक खेळत असलेल्या रहमानुल्लाह गुरबाजला 22 धावांवर एलिसने तंबूत पाठवले. कर्णधार नितीश राणाने 24 धावांचे योगदान दिले. रसेलने 19 चेंडूवर 35 धावा केल्याने केकेआर संघ सामन्यात परत आला. मात्र, रसेल व जम बसलेला व्यंकटेश अय्यर हे केवळ चार चेंडूंच्या अंतराने बाद झाल्याने केकेआर पुन्हा अडचणीत सापडला. शार्दुल ठाकूर व सुनील नरेन यांनी प्रत्येकी षटकार खेळला.

त्याचवेळी पावसामुळे 16 षटकानंतर खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी केकेआरला विजयासाठी 4 षटकात 46 धावांची आवश्यकता होती. अखेर पाऊस न थांबल्याने पंजाबला डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी विजयी घोषित केले गेले.

(IPL 2023 Punjab Kings Beat KKR By 6 Runs Arshdeep Singh Bhanuka Rajapaksa Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात झाली धोनीला दुखापत? प्रशिक्षक म्हणतायेत, “वयाच्या या टप्प्यावर…”
“तो संघात असल्यावर काळजी नसते”, कर्णधार हार्दिककडून राशिदचे तोंडभरून कौतुक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---