---Advertisement---

पंजाबच्या विजयात शाहरुख-सिकंदर शो! लखनऊ सुपरजायंट्सचा घरच्या मैदानावर पहिला पराभव

---Advertisement---

आयपीएल 2023 च्या 21 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्स संघ समोरासमोर आले. पंजाबच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत लखनऊ सुपरजायंट्सला 159 धावांवर रोखले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिले. सिकंदर रझा व शाहरुख खान यांनी अखेरच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत दोन गडी राखून विजय मिळवला. लखनऊ संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावरील हा पहिला पराभव ठरला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर लखनऊचे सलामीवीर केएल राहुल व कायले मेयर्स यांनी 6 षटकात 49 धावा केल्या. मात्र, मेयर्स व हुडा 9 धावांच्या अंतराने तंबूत परतले. कृणाल पंड्याने 18 धावांची खेळी केली. मागील सामन्यात सामनावीर ठरलेल्या पूरनला खातेही खोलता आले नाही. एका बाजूने केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केले. त्याने 56 चेंडूवर 74 धावांची खेळी केली. पंजाबसाठी कर्णधार करनने तीन व रबाडाने 2 बळी मिळवत लखनऊचा डाव 159 पर्यंत रोखला.

या धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. लखनऊसाठी पदार्पण करणाऱ्या युद्धवीर चरकने पंजाबचे दोन्ही सलामीवीर 17 धावांमध्ये तंबूत पाठवले. शॉर्ट व हरप्रीत भाटिया यांनी महत्वपूर्ण योगदान देत पंजाबला सामन्यात कायम ठेवले. मात्र, सिकंदर रझाने सामन्यात रंगत आणली. त्याने लखनऊच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि वेगवान अर्धशतक पूर्ण केले. विजयासाठी 21 धावांची गरज असताना तो बाद झाला. अखेर शाहरुख खानने 10 चेंडूत 23 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

(IPL 2023 Punjab Kings Beat Lucknow Supergiants By 2 Wickets Curran Sikandar Raza Shahrukh Khan Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

वानखेडेवर होणार नारीशक्तीचा जागर! WPL जर्सी आणि हरमन दिसणार टॉसला, मुंबई इंडियन्सचा कौतुकास्पद उपक्रम
युवा करन ठरला पंजाबचा 15 वा कर्णधार! दिग्गजांनी वाहिलीये नेतृत्वाची धुरा, वाचा यादी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---