इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 63व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात लखनऊचा विस्फोटक फलंदाज क्विंटन डी कॉक याने मुंबईविरुद्ध असे काही केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. डी कॉकने मुंबईचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याच्या गोलंदाजीवर एका हाताने खणखणीत षटकार मारला आहे. यासोबतच त्याने भारतीय संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची आठवण करून दिली आहे. यासोबतच त्याने खास विक्रमही नावावर केला आहे.
या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत लखनऊ सुपर जायंट्सला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी लखनऊकडून डावाची सुरुवात करण्यासाठी क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) मैदानात उतरला होता. यावेळी डी कॉकने डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी आलेल्या ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याच्या दुसऱ्याच चेंडूवर एकहाती षटकार मारला. जॉर्डनने हा चेंडू ऑफ कटर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. मात्र, डी कॉकने पुढे येऊन मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याच्या खालच्या हातातून बॅट सुटली आणि त्याने एका हाताने मिड ऑफच्या वरून गगनचुंबी षटकार मारला.
ONE HANDED SIX! 🔥
Do haathon se taaliyan for that Quinny shot 👏👏
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 16, 2023
मात्र, या सामन्यात तो खास काही करू शकला नाही. त्याला फक्त 15 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 16 धावाच करता आल्या. या धावा करताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
Quinton de Klass 🫡💙 pic.twitter.com/L3FsbBnmli
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 16, 2023
क्विंटन डी कॉकचा विक्रम
या सामन्यात फलंदाजी करताना डी कॉकने 12 धावा करताच त्याच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 9000 धावांची नोंद झाली. अशाप्रकारे तो टी20 क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा 15वा खेळाडू ठरला. त्याने 307 डावांमध्ये 9004 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 6 शतके आणि 57 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू आहेत. त्यामध्ये डेविड मिलर (9610), एबी डिविलियर्स (9424) आणि फाफ डू प्लेसिस (9182) या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2023 quinton de kock hit an amazing six with one hand and completed 9000 runs in t20 cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 10 वर्षांनंतर मुंबईसाठी पीयुष चावलाला जमली ‘अशी’ कामगिरी, आधी भज्जीने केलेला पराक्रम; वाचाच
समुद्रामध्ये जहाज बनली क्रिकेटचं मैदान, चौकार-षटकार मारूनही हरवला नाही चेंडू, जाणून घेण्यासाठी पाहा Video