येत्या 31 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेपूर्वी संघांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अनेक संघांचे कर्णधार बदलले आहेत, तर काही खेळाडूंना दुखापतींमुळे संघाची साथ सोडावी लागली आहे. त्यात राजस्थान रॉयल्स संघाचाही समावेश आहे. राजस्थानने स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ताफ्यात खतरनाक गोलंदाजाला सामील केले आहे. खरं तर, राजस्थानमध्ये दुखापतीमुळे आयपीएल 2023मधून बाहेर झालेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप शर्माची वर्णी लागली आहे. राजस्थानने स्वत: याची घोषणा केली आहे.
संदीप शर्माची राजस्थानमध्ये एन्ट्री
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma) याला सामील केले आहे. संदीपकडे आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याचा खास अनुभव आहे. त्याने या लीगमध्ये आतापर्यंत 104 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 114 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. संदीप यापूर्वी पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांकडून खेळला आहे. तसेच, तो नवीन चेंडू हातात घेतल्यावर खूपच खतरनाक गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1640308028292620289
राजस्थानला भासणार प्रसिद्ध कृष्णाची उणीव
आयपीएल 2022 मध्ये राजस्थानला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात प्रसिद्ध कृष्णा याने गोलंदाजीतून मोलाचे योगदान दिले होते. युझवेंद्र चहल याच्यानंतर राजस्थानसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कृष्णाच्या नावावर होता. त्याने 17 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या होत्या.
पहिल्या सामन्यात राजस्थानची हैदराबादशी टक्कर
संजू सॅमसन याच्या नेतृत्वात राजस्थान संघ आयपीएल 2023मध्ये आपल्या अभियानाची सुरुवात सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध करेल. राजस्थानचा मागील हंगाम खूपच चांगला राहिला होता. संघाने अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2008च्या उद्घाटनाच्या हंगामाची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. (ipl 2023 rajasthan royals included pacer sandeep sharma as Prasidh Krishna replacement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनीसारखी क्रेझ इतर कोणत्याही क्रिकेटपटूला नाही’, वर्कआऊट करताना पाहून फॅन्सचा जिमबाहेर राडा
बेपत्ता झालेल्या केदार जाधवच्या वडिलांबाबत मोठी बातमी, जाणून घ्याच






