Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयचा मोठा निर्णय! स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील राजस्थानच्या खेळाडूला दिलासा

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयचा मोठा निर्णय! स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील राजस्थानच्या खेळाडूला दिलासा

February 22, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
BCCI-And-IPL

Photo Courtesy: iplt20.com


जगातील प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये सामील होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2013मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाचा माजी खेळाडू अजित चंडिला या क्रिकेटपटूवर आजीवन बंदी घातली गेलेली. अशात, बीसीसीआयचे लोकपाल विनीत शरण यांनी त्याला मोठा दिलासा दिला आहे. विनीत यांनी चंडिलावरील आजीवन बंदी हटवत त्याची शिक्षा 7 वर्षांची केली आहे. स्पॉट फिक्सिंगचा आरोप लागलेल्या तीन खेळाडूंमध्ये चंडिलाशिवाय भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांच्या नावाचाही समावेश होता. या तिघांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती.

हे प्रकरण सन 2013मध्ये समोर आले होते. यानंतर भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला होता. हे प्रकरण सार्वजनिक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या घटनेतही बदल झाला होता.

बीसीसीआयने सन 2013मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर अजित चंडिला याला प्रत्येक क्रिकेट प्रकारातून निलंबित केले होते. त्यानंतर 2016मध्ये चंडिलावर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने आजीवन बंदी घातली होती. आता बीसीसीआयचे लोकपाल विनीत शरण (BCCI Ombudsman Vineet Sharan) यांनी चंडिलावर 18 जानेवारी, 2016पासून 7 वर्षांची बंदी घातली आहे.

BCCI ombudsman reduces Ajit Chandila 's ban to 7 years#ajitchandela #bcci #cricket #srisanth #ipl #RajasthanRoyals

— Manoj Joshi (@manojjoshimedia) February 21, 2023

सन 2017मध्ये केरळच्या उच्च न्यायालयाने बीसीसीआयद्वारे एस श्रीसंत (S Sreesant) याच्यावर घातलेली आजीवन बंदी हटवली होती. त्यापूर्वी दिल्लीच्या एका न्यायालयाने 2015मध्ये श्रीसंतला स्पॉट फिक्सिंगच्या सर्व आरोपांतून मुक्त केले होते. मात्र, बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती.

असे असले, तरीही बीसीसीआयने नंतर श्रीसंत आणि अंकित चव्हाणवरील आजीवन बंदी काढून टाकली होती. श्रीसंतच्या बाजूने लागलेल्या निकालानंतर चंडिला आणि अंंकितनेही त्यांच्यावरील बंदी हटवण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, बंदी हटल्यानंतर श्रीसंत त्याच्या घरगुती क्रिकेट संघाकडून खेळताना दिसला होता. तसेच, अंकित मुंबईच्या क्लबसाठी खेळला होता. (bcci ombudsman reduces cricketer ajit chandila ban to seven years read more)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे बाप! 9 चौकार, 17 षटकार अन् 55 चेंडूत 161 धावा; टी20 सामन्यात पंजाब किंग्सच्या वाघाचा धमाका
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग कोचने वाचला दिल्ली कसोटीतील चुकांचा पाढा; म्हणाले, ‘या देशात खेळता येत नसेल, तर…’


Next Post
Mukesh-Ambani

आयपीएलप्रेमींवर अंबानी मेहरबान! आता फुकटात पाहता येतील सर्व सामने, खर्च केलेत 'एवढे' बिलियन डॉलर्स

Sandeep-Lamichhane

बला'त्काराच्या आरोपाखाली क्रिकेटरने खाल्ली जेलची हवा, पण जामीन मिळताच कमबॅक करत फलंदाजांचा काढला घाम

Sarah-Taylor

गुड न्यूज! इंग्लंडच्या दिग्गज महिला खेळाडूची पार्टनर प्रेग्नंट; फोटो शेअर करत म्हणाली, 'मला आनंद होतोय'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143