Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता रूटही दिसणार आयपीएलच्या रणांगणात! राजस्थानने करोडो मोजत केली स्वप्नपूर्ती

December 23, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/England Cricket

Photo Courtesy: Twitter/England Cricket


आयपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये  पार पडला. या लिलावात भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी झाले आहेत. इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रुट याने देखील यावेळी आयपीएल लिलावासाठी त्याचे नाव दिले होते. पाच वर्षानंतर आयपीएल लिलावात आलेल्या रूटचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न यावेळी पूर्ण झाले.

Royals, here's the man you have to Root for. 💗 pic.twitter.com/GeuvNrYVU4

— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 23, 2022

 

जो रूट याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. मात्र, तो अद्याप कधीही आयपीएलमध्ये खेळला नव्हता. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने आयपीएलपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. 2018 आयपीएल लिलावावेळी त्याने आपले नाव नोंद केले होते. मात्र, कोणत्या संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवलेला नव्हता.

यावेळी मात्र स्वतः रूटने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केलेली. एका मुलाखतीत त्याने आयपीएल ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा असून त्याचा भाग व्हायला आपल्याला आवडेल, असे म्हटलेले. या लिलावासाठी त्याची आधारभूत किंमत 1 कोटी इतकी होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. त्यामुळे यावेळी देखील तो आयपीएल खेळणार नाही अशी शक्यता निर्माण झालेली. मात्र, न विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या तिसऱ्या फेरीमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर आधारभूत किमतीची बोली लावत त्याला आपल्या संघात जागा दिली. त्यामुळे रूटचे आयपीएल मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न साकार झाले. इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलर हा देखील राजस्थान संघाचा भाग आहे.

जो रूट हा 2016 टी20 विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. मात्र, त्यानंतर हळूहळू त्याची संघातील जागा गेली. 2019 मध्ये त्याने आपला अखेरचा टी20 सामना खेळला आहे. त्यानंतर त्याच्याकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व देखील देण्यात आलेले. रूट यापूर्वी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश व इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये खेळताना दिसला आहे.

(Joe Root was picked by Rajasthan Royals during IPL 2023 auction)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे बरं नाही! चूक स्वत:ची अन् राग दुसऱ्यावर, विराटचा पंतवर आगपाखड करणारा व्हिडिओ पाहाच
IPL AUCTION: तडाखेबंद फलंदाज आणि मिस्ट्री स्पिनर! काश्मीरचा ‘फुल पॅकेज’ विवरांत बनला करोडपती


Next Post
Hyderabad FC

हैदराबाद एफसीची पुन्हा अव्वल स्थानी झेप; बंगळुरू एफसी घरच्या मैदानावर अपयशी

neeraj-chopra

बर्थडे स्पेशल: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राच्या आयुष्यातील 'या' खास गोष्टी तुम्हाला क्वचितच माहीत असतील

Piyush-chawala

वाढदिवस विशेष: वयाच्या 16व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरची विकेट घेणारा पियुष चावला

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143