इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर या लिलावात मोठी रक्कम मिळाली. जम्मू व काश्मीर संघाचा युवा अष्टपैलू विवरांत शर्मा हा देखील सर्वांना चकित करत करोडपती बनला. तब्बल 2 कोटी 60 लाख रुपये खर्च करून सनरायझर्स हैदराबादने त्याची सेवा मिळवली. मात्र, इतकी मोठी रक्कम मिळवणारा हा खेळाडू नक्की आहे तरी कोण हे आपण जाणून घेऊया.
विवरांत शर्मा हे जवळपास अनेकांना माहीत नसलेले नाव लिलावात आले तेव्हा सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्स यांनी त्याच्यासाठी बोली लावण्याची सुरुवात केली. तिसरा संघ या चढाओढीत सहभागी झाला नाही. केवळ 20 लाख रुपयांपासून सुरू झालेली ही बोली अखेरीस 2.60 कोटींवर जाऊन थांबली. यासह सनरायझर्स हैदराबाद सहभागी होणारा तो तिसरा जम्मू-काश्मीरचा खेळाडू बनला. यादी अब्दुल समद व उमरान मलिक यांनी हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे.
विवरांत डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज तसेच उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. तो लेग स्पिन तसेच ऑफ स्पिन अशा दोन्ही प्रकारची गोलंदाजी करू शकतो. त्याच्या याच खुबीमुळे त्याच्यावर मोठी बोली लागली गेली. विशेष म्हणजे मागील वर्षी अब्दुल समदियानेच त्याला सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमध्ये नेट बॉलर म्हणून आणले होते. विवरांत हा उजव्या हाताचा फलंदाज होता. मात्र, आपला मोठा भाऊ विक्रांत याच्यामुळे त्याने डाव्या हाताने फलंदाजी करण्यास सुरुवात केली.
त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत केवळ 2 प्रथमश्रेणी, 14 लिस्ट ए व 9 टी20 सामने खेळले आहेत.
(Jammu Kashmir Vivrant Sharma Got Whopping 2 Crore 60 Lakhs In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 40 लाखांच्या शिवम मावीला गुजरातने बनवले ‘एवढ्या’ कोटींचा मालक, तरीही गडी तोट्यातच
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ‘हे’ चार खेळाडू मालामाल, मिळाली 15 कोटींहून अधिक रक्कम