Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवघ्या 40 लाखांच्या शिवम मावीला गुजरातने बनवले ‘एवढ्या’ कोटींचा मालक, तरीही गडी तोट्यातच

अवघ्या 40 लाखांच्या शिवम मावीला गुजरातने बनवले 'एवढ्या' कोटींचा मालक, तरीही गडी तोट्यातच

December 23, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Shivam-Mavi

Photo Courtesy: Twitter/IPL


इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. या लिलावात काही अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळाल्या. अनेक दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, तर युवा खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. काहींना मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त, तर काहींना कमी रक्कम मिळाली. असाच एक खेळाडू आहे, ज्याला या लिलावात मागील वर्षीच्या तुलनेत 1.25 कोटी रक्कम कमी मिळाली.

आयपीएल 2023च्या मिनी लिलावात शिवम मावी याला मागील वर्षीच्या तुलनेत 1.25 कोटी रक्कम कमी मिळाली. 40 लाखांची मूळ किंमत असलेल्या मावीला या लिलावात गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने 6 कोटी रुपयांच्या किंमतीत आपल्या ताफ्यात सामील केले. त्याला मागील वर्षी आयपीएल 2022च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने 7.25 कोटी रुपये खर्च करत संघात सामील केले होते. मावीने मागील वर्षी फक्त 6 सामने खेळले, त्यात त्याला फक्त 5 विकेट्स घेतल्या होत्या.

And he is SOLD to the Gujarat Titans for INR 6 Crores 👏👏#TATAIPLAuction | @TataCompanies

— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022

शिवम मावीची आयपीएल कारकीर्द
शिवम मावी याच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 2018पासून आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो 2022पर्यंत तीन हंगाम खेळला. त्याच्या एकूण आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 32 सामने खेळताना 8.71च्या इकॉनॉमी रेटने 30 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 21 धावा देत 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. (Shivam Mavi goes to Gujarat Titans for 6 Crore rupees)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ‘हे’ चार खेळाडू मालामाल, मिळाली 15 कोटींहून अधिक रक्कम
मूर्ती लहान कीर्ती महान! सॅम करन बनला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पहिल्या पाचात एकच भारतीय


Next Post
Shakib Al Hasan

IPL 2023 Auction | प्रतिभा असुनही 'या' पाच दिग्गजांवर संघांनी दाखवला अविश्वास, पाहा यादी

Manish-Pandey

आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर दिल्लीने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात

Narayan Jagadeesan

मि. कंसिस्टंट 'जगदीसन' केकेआरकडे! इतक्या रकमेत बनला नाईट रायडर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143