भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. विराटला क्रिकेटव्यतिरिक्त महागड्या गाड्यांचीदेखील आवड आहे. त्याच्याकडे परदेशातील गाड्यांचाही ताफा आहे. विराटला जेव्हाही संधी मिळते, तेव्हा तो आपली गाडी घऊन फेरफटका मारण्यासाठी जातो. मात्र, विराटने नुकताच खुलासा केला की, त्याने महागड्या गाड्या विकल्या.
विराटने का विकल्या आलिशान गाड्या?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या शोवर बोलताना विराट कोहली (Virat Kohli) याने मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याच्याकडे अशा अनेक गाड्या होत्या, ज्यांचा काहीच वापर नव्हता. तो म्हणाला की, “माझ्याकडे अधिकतर गाड्या अशा होत्या, ज्या खरेदी करण्याचा निर्णय अव्यवहार्य होता. मी त्यापैकी अनेक गाड्या क्वचितच चालवल्या किंवा त्यातून प्रवास केला. एका क्षणानंतर मला समजले की, हे सर्व व्यर्थ गोष्ट आहे. अशात मी त्यातील अधिकतर गाड्या विकल्या. आता माझ्याकडे त्याच गाड्या आहेत, ज्यांचा मी वापर करतो.”
‘मोठे झाल्यानंतर खेळण्यांची गरज खूप कमी पडते’
आरसीबी (RCB) संघाचा माजी कर्णधार असलेल्या विराटने म्हटले की, तुम्ही जसजसे मोठे होता, तसे तुम्हाला गोष्टी समजू लागतात. तो म्हणाला, “मला वाटते की, जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा तुम्ही अधिक जागरुक आणि परिपक्व होता. तुम्हाला खेळण्यांची गरज खूपच कमी पडते आणि हे वास्तविक आहे.”
आरसीबीसाठी धमाल करण्यासाठी विराट तयार
विराट कोहली याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले आहे. मात्र, मागील हंगामात त्याचा फॉर्म घसरला होता. त्याला 115.99च्या स्ट्राईक रेटने खेळताना 341 धावा करता आल्या होत्या. विराट आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. विराटने मागील वर्षात जबरदस्त धावा कुटल्या आहेत. तसेच, त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक ठोकले आहे. आता आगामी हंगामात तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (ipl 2023 rcb batsman virat kohli tells that he has sold his most of his luxurious cars)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLपूर्वी मुंबईच्या नवीन हेड कोचची विरोधी संघांना चेतावणी; म्हणाला, ‘मी काय इथे तिसऱ्या अन् चौथ्या…’
विराटने घेतली 2 सार्वकालीन महान खेळाडूंची नावे; एक सचिन, पण दुसरा कोण? घ्या जाणून