रविवारी (दि. 21 मे) आयपीएल 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील 69वा आणि 70वा असे शेवटचे दोन सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना दुपारी 3.30 वाजता मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघात सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. आरसीबी संघाने सामना गमावला, तर त्यांचे प्लेऑफमध्ये जाणे कठीण होईल. आरसीबीला एका विजयाची आवश्यकता आहे. गुजरात संघ आधीच प्ले-ऑफमध्ये गेल्यामुळे त्यांना चिंता नाहीये.
मागील सामन्यात शतक ठोकल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणखीच लयीत आला आहे. तसेच, हा सामना घरच्या मैदानावर असल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे पारडे जड मानले जाऊ शकते. मात्र, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने संपूर्ण हंगामात शानदार खेळ दाखवला आहे. अशात म्हटले जाऊ शकते की, या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. शेवटी, विजय त्याच संघाचा होईल, जो संघ मैदानावर शानदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरेल.
खेळपट्टी आणि हवामान
बंगळुरू येथे शनिवारी (दि. 20 मे) सायंकाळी पाऊस झाला होता. रविवारीही असे होण्याची शक्यता आहे. हे आरसीबीसाठी चांगले संकेत नाहीयेत. नाणेफेक जिंकून संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. नाणेफेक जिंकणारा संघ 200 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा प्रयत्न करतील.
कुठे पाहाल सामना?
भारतीय प्रमाणवेळेनुसार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) संघातील सामना 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल. तसेच, डिजिटल माध्यमांवर जिओ सिनेमा ऍपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल.
बेंगलोर विरुद्ध गुजरात संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, मायकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा
गुजरात टायटन्स
शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, दसून शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद (ipl 2023 rcb vs gt 70th match preview predicted eleven live streaming know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियातील रिंकूच्या निवडीविषयी सर्वांनी मांडली मतं, पण त्याला काय वाटतंय? वाचून कौतुकच कराल
मुंबईसाठी ‘करो वा मरो’ सामना! वानखेडेत हैदराबादला देणार टक्कर, ‘अशी’ असू शकते संभावित प्लेइंग इलेव्हन