सोमवारी (10 एप्रिल) चाहत्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 200पार धावसंख्या केली. पण प्रत्युत्तरता लखनऊच्या फलंदाजांनी देकील धमाकेदार खेळी करत लक्ष्य गाठले. एक विकेट राखून लखनऊने सामना जिंकला. पराभवानंतर यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याला कारणीभूत धरले जात आहे. शेवटच्या चेंडूवर कार्तिकने केलेली चूक पाहण त्याची तुलना एमएस धोनीसोबत होत आहे.
आरासबीने या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस (79), विराट कोहली (61) आणि ग्लेन मॅक्सवेल (59) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 2 बाद 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊने हा सामना 9 विकेट्सच्या नुकसानावर अगदी शेवटच्या चेंडूवर नावावर केला. शेवटच्या चेंडूवर जिंकलण्यासाठी लखनऊला एक धाव हवी होती, जी त्यांनी मिळवली. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने शेवटच्या चेंडूवर केलेली एक चूक आरसीबीला महागात पडली.
लखनऊला शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी असल्यामुळे चेंडू बॅटला लागो अगर न लागो फलंदाज धाव घेण्यासाठी पळणार होते. कार्तिकला देखील या गोष्टीची कल्पना होती, ज्यामुळे त्याने एका हातातील ग्लव देखील काढला होता. अपेक्षेप्रामाने आवेश खानला हर्षल पटेलचा चेंडू खेळता आला नाही. पण यष्टीरक्षक कार्तिकने अनपेक्षित चूक केली. दबावाच्या परिस्थितीत कार्तिकला यष्टीपाठी शेवटचा चेंडू पकडताच आला नाही आणि फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. कार्तिकच्या या चुकीमुळे आरसीबीच्या सर्व खेळाडूंची मेहनत व्यर्थ गेली.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1645491825770364929?s=20
https://twitter.com/oyedarbaar/status/1645624792060669953?s=20
भारत आणि बांगलादेश 2016 साली टी-20 विश्वचषकात आमने सामने होते. एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजयासाठी शेवटच्या चेंडूवर बांगलादेशला 2 धावा हव्या होत्या. यष्टीपाठी भारतीय कर्णधार एमएस धोनी होता, तर गोलंदाज हार्दिक पंड्या होता. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या मुशफिकूर हमनानला हा चेंडू खेळता आला नाही आणि ते एक धाव घेण्यासाठी पळाले. पण धोनीने आपली चपळाई दाखवत बांगलादेशी फलंदाजाला धावबाद केले आणि सामना जिंकला होता. कार्तिक सोमवारच्या सामन्यात धोनीप्रमाणे हातातला एक ग्लव काढून तयार होता, पण त्याला चेंडू मात्र पकडता आला नाही.
https://twitter.com/the_shrewd_dude/status/1645488374160166912?s=20
दरम्यान, आरसीबीसाठी शेवटच्या षटकात हर्षल पटेल () गोलंदाजी करत होता आणि लखनऊला जिंकण्यासाठी अजून 5 धावा लागत होता. षकातील पहिल्या चेंडूवर त्यान एक धाव दिली. दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने मार्क वूड याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने दोन धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर बिश्नोईने पुन्हा एक धाव घेतली आणि जयदेव उनाडकड स्ट्राईकवर आला. उनाडकट या षटकातील पहिला चेंडू खेळताना फाफ डू प्लेसिसच्या हातात झेलबाद झाला. अशात शेवटच्या चेंडूवर आवेश खान स्ट्राईकवर होता आणि संघाला एक धाव हवी होती. सामना सुपर ओव्हरपर्यंत जाणार, असे सर्वांना वाटत होते. कार्तिकच्या चुकीमुळे लखनऊला शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळाली. (Dinesh Karthik’s mistake on the last ball cost RCB dear)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरनचा चिन्नास्वामीवर धमाका! केवळ 15 चेंडूवर ठोकली आयपीएल इतिहासातील दुसरी वेगवान फिफ्टी
लईच चोपलयं! उनाडकतच्या नावावर आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम