---Advertisement---

लईच चोपलयं! उनाडकतच्या नावावर आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम

On: सोमवार, एप्रिल 10, 2023 10:40 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला‌. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 212 धावा उभारल्या. आरसीबीसाठी पहिल्या तीनही फलंदाजांनी आक्रमक अर्धशतके झळकावली. त्याचवेळी लखनऊसाठी खेळणारा अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत हा चांगलाच महागडा ठरला. याचसोबत त्याने आयपीएल इतिहासातील एका नकोशा विक्रमाला आपलेसे केले. 

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर अक्षरशः धावांचे तुफान आणले. पहिल्या सहा शतकात विराट कोहलीने वेगवान आक्रमण केले. त्याने 35 चेंडूंवर अर्धशतक झळकावले. त्याने 61 धावा काढल्या. त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी धावांचा वेग तसाच ठेवला. दोघांनी विरोधी गोलंदाजी झोडून काढली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण करत संघाला 200 पार नेले.

लखनऊचा अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत हा या सामन्यात चांगलाच महागडा ठरला. त्याने या डावात 2 षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 27 धावा दिल्या. पहिल्या षटकात केवळ चार धावा दिल्यानंतर 18 व्या षटकात गोलंदाजीला आल्यावर त्याच्या विरोधात दोन षटकार व दोन चौकार लगावले गेले.

याबरोबरच आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकले गेलेला तो गोलंदाज ठरला. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत फलंदाजांनी तब्बल 160 षटकार लगावले. त्याबरोबरच उमेश यादव याच्याविरुद्ध देखील फलंदाजांनी इतके षटकार ठोकले आहेत. तसेच अनुभवी भुवनेश्वर कुमार याच्याविरुद्ध देखील फलंदाजांनी 115 षटकार मारलेत. या यादीमध्ये चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे मोहम्मद शमी व संदीप शर्मा आहेत. त्यांच्याविरुद्ध 109 व 105 षटकार ठोकले गेले आहेत.

(Jaydev Unadkat Indian Pacer Who Conceded Most Sixes In IPL History With Umesh Yadav)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

एकमेवाद्वितीय विराट! लाजवाब अर्धशतकासह कोहलीने रचला आयपीएलमध्ये इतिहास, तो दुर्मिळ विक्रम नावे 
चिन्नास्वामीचा ‘महाराजा’ बनला विराट! टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा पराक्रम केला नावावर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---