सोमवारी (1 मे) इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना अनुभवता आला. आरसीबीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केली नव्हती, पण तरीही यजमान लखनऊ साघाला विजय मिळाला नाही. सामन्यादरम्यान लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर अष्टपैलू कृणाल पंड्या याने राहुलच्या दुखापतीविषयी माध्यमांना माहिती दिली.
लखनऊने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. सामन्यातील दुसऱ्याच षटकात लखनऊचा कर्णदार केएल राहुल (KL Rahul) श्रेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. तो चेंडूच्या मगाे धावता असताना थांबला आणि त्याला वेदान होत असल्याचे पाहायला मिळाले. नंतर संघाचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी राहुलला मैदानातून बाहेर नेले. राहुल नंतर लखनऊच्या फलंदाजीवेळी शेवटच्या षटकात खेळायला आला. पण त्याने तीन चेंडूत एकही धाव केली नाही आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. (RCB vs LSG)
राहुल मैदानाबाहेर गेल्यानंतर संपूर्ण सामन्यात लखनऊचे नेतृत्व अष्टपैलू कृणाल पंड्या (Krunal Pandya) याने केले. आरसीबीकडून या सामन्यात 18 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर कृणालने राहुच्या दुखापतीविषयी महत्वाची माहिती माध्यमांनी दिली. कृणाल पंड्या म्हणाला, “सध्या संघ व्यवस्थापनाकडून केएल राहुलला एका मेडिकल चेकअपसाठी पाठवले जाईल. या चाचणीनंतरच संग एक निर्णयावर पोहोचेल.”
“मला वाटते आम्ही सामन्याच्या पूर्वार्धात चांगली गोलंदाजी केली होती. आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावर आम्ही खूप खुश आहोत. मात्र फलंदाजी करताना आम्ही आमच्या नियोजनानुसार खेळी करू शकलो नाही,” असेही कृणाल पंड्या पुढे म्हणाला. दरम्यान, लखनऊला या सामन्यात विजयासाठी 127 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण 19.5 षटकांमध्ये लखनऊ संघ 108 धावा करून सर्वबाद झाला. (Krunal Pandya gave important information about KL Rahul’s injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराटने गंभीरला त्याची जागा दाखवली’, LSG vs RCB सामन्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
“मला लाज वाटते’, गंभीर-विराटच्या अभूतपूर्व राड्यानंतर हरभजनने जागवल्या जुन्या आठवणी