लखनऊ सुपर जायंट्साने शेवटच्या चेंडूवर आरसीबीला पराभवाची धूळ चारली. शेवटच्या चेंडूवर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने केलेली चूक आरीसीबीला चांगली महागात पडली. शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर संघातील खेळाडूंना आनंद होणे सहाजिक आहे. पण लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर याने सामना जिंकल्यानंतर दिलेली रिएक्शन सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. विजयानंतर गंभीर फारच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना सोमवारी (10 एप्रिल) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. आरसीबीचे हे होम ग्राउंड असल्याने लखनऊच्या तुलनते आरसीबीचे चाहते स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सामना सुरू असताना विजयासाठी आरसीबीचे पारडे जड वाटत होते आणि अशात उपस्थित चाहत्यांकडून संघाला मोठा प्रतिसाद देखील मिळत होता. असे असले तरी, लखनऊने शेवटच्या काही षटकांमध्ये चित्र पालटवले आणि सामना नावावर केला.
विजयानंतर लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) मैदानात आला आणि त्याने उपस्थित चाहत्यांकडून पाहून शांत राहण्याचा इशारच करून टाकला. व्हिडिओच्या शेवटची गंभीरने काही अपशब्द अच्चारल्यासारखेही दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत.
Gautam Gambhir to RCB Fans !! 🔥
— Tanay Vasu (@tanayvasu) April 10, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याच एकंदरीच विचार केला, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने हे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर 9 विकेट्स गमावून गाठले. निकोलस पूरन सामनावीर ठरला, ज्याने 19 चेंडूत 326च्या स्ट्राईक रेटने 62 धावा केल्या. अवघ्या 15 चेंडूत पुरनने अर्धशतक केले, हे चालू हंगामातील सर्वात वेगवान तर एकंदरीत आयपीएलमधील दुसऱे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
Gautam Gambhir to the Chinnaswamy crowd after the match. pic.twitter.com/Uuf6Pd1oqw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2023
तत्पूर्वी आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 79, माजी कर्णधार विराट कोहली याने 61, तर ग्लेन मॅक्सवेल याने 59 धावांची खेळी केली. लखनऊसाठी पूरनव्यतिरिक्त मार्क स्टॉयनिस याने 65 धावांची ताबडतोड खेळी केली. आरीसीबीसाठी मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या, तर हर्षल पटेलने 2 विकेट्स घेतल्या. शेवटच्या चेंडूवर लखनऊला विजयासाठी एक धाव हवी होती. यावेळी स्ट्राईकवर आवेश खान होता. हर्षल पटेलने टाकेलला शेवटचा चेंडू आवेशला खेळता आला नाही. पण यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने हा चेंडू पकडताना चूक केली. परिणामी फलंदाजांनी एक धाव घेत लखनऊला विजय मिळवून दिला. (After the win, Gautam Gambhir looked at the RCB fans and warned them to keep their mouths shut)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबी अखेरच्या चेंडूवर पराभूत! लखनऊ सुपरजायंट्सने पार केले 213 धावांचे आव्हान, पूरन-स्टॉयनिस ठरले नायक
लईच चोपलयं! उनाडकतच्या नावावर आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम