---Advertisement---

VIDEO । डायरेक्ट हिटच्या बाबतीत सिराजने दिली विराटला टक्कर! पंजाबचा मध्यक्रमातील फलंदाज स्वस्तात बाद

On: गुरूवार, एप्रिल 20, 2023 9:03 PM
Virat Kohli Mohammad Siraj
---Advertisement---

गुरुवारी (20 एप्रिल) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने आले होते. आरसीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 174 धावा केल्या आणि लखनऊला विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात यजमान पंजाब किंग्ज फलंदाजीला आल्यानंतर फलंदाज झटपट विकेट गमावताना दिसले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हरप्रीत सिंग याला बाद करण्यासाठी मोहम्मद सिराज याने जबरदस्त थ्रो केला. आरसीबीने हा सामना 24 धावांनी जिंकला.

पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात हरप्रीत सिंग () धावबाद झाला. पंजाबची ही चौथी विकेट होती, ज्यी त्यांनी 43 धावांवर गमावली. विजय कुमार वैशाख () याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून पंजाबने गोलंदाजीसाठी बोलावले. डावातील पाचव्या षटकात विजयकुमार गोलंदाजीला आला आणि तिसऱ्याच चेंडूवर त्याला विकेट मिळाली. हरप्रीतने 10 चेंडूत 15 धावा केल्या होत्या आणि मोहम्मद सिराजच्या अप्रतिम थ्रोमुळे त्याला विकेट गमवावी लागली. सिराजच्या थ्रोचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

https://twitter.com/IPL/status/1649027077495205889?s=20

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर 175 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला पंजाब संग 150 धावांवर गुंडळला गेला. 18.2 षटकात पंजाबने सर्व विकेट्स गमावल्या. आरसीबीचे नेतृत्व या सामन्यात विराट कोहली करत होता, ज्याने 59 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर संघाचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 84 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजी विभागात आरसीबीसाठी मोहम्मद सिराज मॅच विनर ठरला. सिराजने 21 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या.

पंजाबच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांनी 46 आणि 41 धावांची वादळी खेळी केली. गोलंदाजी विभागात हरप्रीत बरार याने सर्वाधिक 2, तर अर्शदीप सिंग आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. (Awesome direct hit by Mohammad Siraj)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

विराटच्या नेतृत्वात आरसीबी विजयी मार्गावर! पंजाबवर नोंदवला 24 धावांनी दणदणीत विजय  
मूर्ती लहान, कीर्ती महान! 19 वर्षीय खेळाडूने 6 ओव्हरमध्ये घेतल्या 6 विकेट्स, मोडला 41 वर्षांपूर्वीचा विक्रम

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---