आयपीएल 2023 साठी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून 15 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ दिला गेला होता. यानंतर सर्व संघांनी त्यांची यादी घोषित केली. प्रत्येक फ्रॅंचायजीने आपला संघ अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून, संघाच्या योजनेत बसत नसलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर आता कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे यावर आपण नजर टाकूया.
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने 18 खेळाडूंना कायम राखले आहे. त्यामुळे आता ते लिलावात आणखी सात खेळाडूंना खरेदी करू शकतात. त्यात दोन विदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची त्यांच्याकडे मुभा असेल. त्यांच्याकडे आता 20.45 कोटी रुपये शिल्लक आहेत.
All details about IPL 2023 ahead of auction: pic.twitter.com/dpxzcUuPds
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2022
पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने 16 खेळाडू कायम राखल्याने आता 9 खेळाडू खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे 20.55 कोटी इतकी रक्कम शिल्लक असेल. आयपीएल 2022 चे विजेते गुजरात टायटन्स हे सध्या आपल्याकडे शिल्लक असलेल्या 19.25 कोटी रुपयांत 7 खेळाडू खरेदी करू शकतात. तर, उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला 9 खेळाडू खरेदी करण्यासाठी केवळ 13.20 कोटी रुपये मिळतील. दिल्ली कॅपिटल्सला 19.45 कोटी रुपयांमध्ये पाच खेळाडू खरेदी करण्याची संधी असेल.
पुढे येणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये सर्वात जास्त रक्कम सनरायझर्स हैदराबाद संघाकडे असेल. त्यांना 42.25 कोटी रुपयांमध्ये तेरा खेळाडू खरेदी करावे लागतील. तर कोलकाता नाईट रायडर्स 7.05 कोटी रुपयांमध्ये 11 खेळाडू खरेदी करू शकतात. आपल्या पहिल्याच हंगामात प्ले ऑफपर्यंत पोहचलेल्या लखनऊ सुपरजायंट्सला 10 खेळाडू खरेदी करण्यासाठी 23.35 कोटी रुपये मिळतील. पंजाब किंग्स 32.20 कोटी रुपयांत 9 खेळाडू खरेदी करतील. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 8.75 कोटी रुपयात 7 खेळाडू खरेदी करू शकतात.
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये सर्व फ्रॅंचायजीकडे मिळून 206.5 कोटी इतकी रक्कम शिल्लक असणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त 87 भारतीय व 30 विदेशी खेळाडूंवर बोली लागू शकते.
(IPL 2023 Retention Teams Remaining Purse)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनने ‘या’ भारतीय गोलंदाजाबद्दल काढले गौरोद्गार, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला