आयपीएल 2023 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ समोरासमोर आले. मोहली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी व गोलंदाजांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 24 धावांनी दणदणीत विजय मिळवला. फाफ डू प्लेसिस, कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे आरसीबीच्या विजयाचे नायक ठरले.
???????????????? ???????? ???????????????????????????? ???????????????? ????@RCBTweets clinch a 24-run victory over #PBKS in Mohali ????????
Scorecard ▶️ https://t.co/CQekZNsh7b#TATAIPL | #PBKSvRCB pic.twitter.com/RGFwXXz5eC
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
या सामन्यात दोन्ही संघांना आपल्या नियमित कर्णधारांशिवाय मैदानात उतरावे लागले. नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यासह आरसीबीला दमदार शतकी सलामी दिली. विराटने 59 धावांची खेळी केली. तर, प्लेसिसने 84 धावा कुटल्या. या दोघांनी 137 धावा पहिल्या विकेटसाठी जोडल्या. त्यानंतर इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू न शकल्याने आरसीबीचा डाव 174 पर्यंत मर्यादित राहिला.
या धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर त्यांना पहिला धक्का बसला. पॉवर प्लेमध्ये पंजाबने 49 धावा करताना चार बळी गमावले होते. मधली फळी अपयशी ठरत असताना प्रभसिमरनने 46 धावांची खेळी केली. अखेरीस जितेश शर्मा याने पंजाबच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला. त्याने 41 धावा केल्या. आरसीबीसाठी सिराजने सर्वाधिक चार बळी मिळवले.
(IPL 2023 Royal Challengers Banglore RCB Beat Punjab Kings By 24 Runs Plessis Virat Siraj Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये ‘या’ संघांनी नवीन कर्णधार नेमून केली मोठी चूक! पाहा आकडेवारी
कॅप्टन्सी सोडल्यानंतर 566 दिवसांनी विराट पुन्हा बनला कर्णधार, ‘या’ कारणामुळे सांभाळली संघाची धुरा





