---Advertisement---

‘जेव्हा धोनी निघून जाईल, तेव्हा त्याचे महत्त्व कळेल…’, इंग्लंडच्या दिग्गजाची भावूक करणारी प्रतिक्रिया

CSK-Captain-MS-Dhoni
---Advertisement---

एमएस धोनी हा असा खेळाडू आहे, ज्याची गणना जगभरातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, धोनी अजूनही आयपीएलमध्ये सक्रिय आहे. धोनी आयपीएल 2023मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीपासूनच असे म्हटले जात आहे की, धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. मात्र, संघ व्यवस्थापन किंवा धोनीकडून याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अशात इंग्लंडचा माजी कर्णधार ऑयन मॉर्गन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) याने कर्णधार म्हणून एमएस धोनी (MS Dhoni) याचे महत्त्व सांगितले आहे. मॉर्गन म्हणाला आहे की, जेव्हाही धोनी निवृत्ती घेईल, तेव्हा चेन्नईला त्याची उणीव भासेल. तो असेही म्हणाला की, धोनी मैदानात आणि ड्रेसिंग रूममध्ये एक वेगळ्याच प्रकारची उर्जा घेऊन येतो.

खरं तर, एमएस धोनी याने सनरायझर्स हैदराबाद सामन्यानंतर बोलताना अशा काही गोष्टी बोलल्या, ज्यामुळे चाहत्यांना वाटले की, तो आता निवृत्ती घेईल. धोनी म्हणाला की, “हा त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा टप्पा आहे.” तो असेही म्हणाला की, तो आता म्हातारा झाला आहे. याव्यतिरिक्त एडेन मार्करम याचा शानदार झेल घेण्याबाबत तो म्हणाला की, तो चुकीच्या स्थितीत होता, त्यामुळे त्याला झेल पकडता आला.

काय म्हणाला मॉर्गन?
मॉर्गन याने धोनीच्या या वक्तव्यावर मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने सामन्यानंतर जिओ सिनेमावर बोलताना म्हटले की, “मुलाखतीतून ही मोठी गोष्टी समोर आली. ते जे काही बोलत होते, यावरून समजते की, कशाप्रकारची उर्जा तो मैदानात घेऊन येतो. त्याने सांगितले की, त्याला संघाचे नेतृत्व करताना किती मजा येत आहे. सामन्यादरम्यान तो खूपच एनिमेटेड असतो. सामन्यानंतर युवा खेळाडूंसोबत तो त्याचा अनुभव शेअर करत होता. किती विनम्रतेसह त्याने म्हटले की, तो चुकीच्या स्थितीत होता, तर असे बिल्कुल नव्हते. जेव्हा एमएस धोनी निघून जाईल, तेव्हा त्याची कमतरता जाणवेल. खेळाडूंना त्याची उणीव खूप भासेल.”

खरं तर, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर धोनी म्हणाला की, “हा माझ्या कारकीर्दीतील अखेरचा टप्पा आहे. त्यामुळे मी याचा आनंद लुटणे गरजेचे आहे. चाहत्यांनी मला प्रचंड प्रेम आणि सन्मान दिला आहे. नेहमी हेच लोक मला ऐकण्यासाठी उशिरापर्यंत थांबतात.”

आता धोनीच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे की, धोनी खरंच आयपीएल 2023नंतर निवृत्ती घेईल का? धोनी काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2023 skipper ms dhoni s absence will be felt massively says eoin morgan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयपुढे नमलं पाकिस्तान! आशिया चषकासाठी आला नवीन प्रस्ताव, जाणून घ्याच
नाणेफेक जिंकत गुजरात संघाचा फलंदाजीचा निर्णय, चौथ्या विजयासाठी पंड्यासेना सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---