सोमवारी (दि. 1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर आयपीएल 2023चा 43वा सामना पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या कमी धावसंख्येच्या या सामन्यात बेंगलोर संघाने शानदार विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला. मात्र, सामन्यादरम्यान लखनऊने पहिल्या पाच विकेट्स या 7 विकेट्समध्येच गमावल्या होत्या. त्यामुळे बेंगलोर संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली हा प्रत्येक विकेटवर जल्लोष करत होता.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी बेंगलोर संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत 126 धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा डावही गडगडला. लखनऊला 19.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 108 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना बेंगलोरने 18 धावांनी नावावर केला. या सामन्यानंतर विराट कोहली आणि नवीन-उल-हक (Virat Kohli And Naveen-ul-Haq) यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसले. त्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) हे दोघेही भिडले. त्यामुळे आता यावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.
ट्विटरवर तुफान प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, “काही नाही हे विराट कोहलीचा पीक आहे, जो गौतम गंभीर याला त्याची पातळी दाखवून देत आहे, त्याच्या स्वत:च्या मैदानावर.”
Nothing just peak Virat Kohli showing levels to gautam gambhir in his own stadium.https://t.co/IrALeoUdPD
— ` (@Kohli_Dewotee) May 1, 2023
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “विराट कोहलीने गौतम गंभीरशी घेतला बदला. कधीही न संपणारी कथा.”
Virat Kohli Owning Gautam Gambhir, Never Ending Story😂 pic.twitter.com/ypLaKw4muS
— Pulkit🇮🇳 (@pulkit5Dx) May 1, 2023
आणखी एकाने असे लिहिले की, “यावेळी गंभीर.”
https://twitter.com/desi_bhayo88/status/1653094059806961664
एक जण असेही म्हणाला की, “एक अनुष्कासाठी आणि दुसरे गंभीरसाठी.”
https://twitter.com/AkshatOM10/status/1653093383827787777
एकाने तर असेही लिहिले की, “मी गंभीरप्रमाणे तुम्हाला शांत करणार नाही, तर तुमच्यावर प्रेम करेल- विराट कोहली”
https://twitter.com/Pratham_editz/status/1653088496834297873
एक जण असेही म्हणाला की, “किंग कोहली पूर्ण जोशात आहे गंभीर तू याचा हक्कदार आहेस.”
https://twitter.com/Pavancool06J/status/1653094167575412737
दुखापतग्रस्त केएल राहुल याच्याविषयीही एका युजरने लिहिले की, “गौतम गंभीर राहुलला प्रोत्साहित करताना.”
Gautam Gambhir motivating KL Rahul to go to bat and win this match pic.twitter.com/IHXnB2cuzQ
— Ankit Pathak 🇮🇳 (@ankit_acerbic) May 1, 2023
एकाने चाहत्याचा फोटो शेअर करत लिहिले की, “एका प्रेक्षकाने विराट कोहलीचे चरण स्पर्श केले तेही गौतम गंभीरच्या समोर.”
A fan touched Virat Kohli feet in Lucknow infront of gautam gambhir 🤣 pic.twitter.com/FBqFXvQ6ol
— Kevin (@imkevin149) May 1, 2023
या सामन्यात विजय मिळवताच बेंगलोर संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला. बेंगलोर संघाने हंगामातील पाचवा विजय मिळवत 10 गुण मिळवले आहेत. संघाचा पुढील सामना 6 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. (ipl 2023 twitter reactions virat kohli vs gautam gambhir social media know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेपाळ संघाने रचला इतिहास! यूएईला लोळवत मिळवले आशिया चषक 2023चे तिकीट, ‘हे’ 6 संघ उतरणार मैदानात
लखनऊच्या चाहत्यांना विराटने केले आपलेसे! सामन्यानंतर केलेले ट्विट चर्चेत