सध्या देशभरातीच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेने वेधले आहे. स्पर्धेतील सामने आणि सामन्यांतील वाद असे चित्र नुकतेच पाहायला मिळाले. 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल 2023च्या 43व्या सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात बेंगलोरने 18 धावांनी विजय मिळवला. मात्र, हा सामना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला. ते म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादामुळे. या वादावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशात यूपी पोलिसांचे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.
यूपी पोलिसांचे ट्वीट
आता या वादात यूपी पोलीस (UP Police) यांचीही एन्ट्री झाली आहे. पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लक्षवेधी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, “कोणतेही प्रकरण आमच्यासाठी विराट किंवा गंभीर नाही. कोणत्याही आकस्मिक परिस्थितीत लगेच 112 डायल करा.” त्यांनी पुढे असेही लिहिले की, “वाद घालणे टाळा, आम्हाला कॉल करणे टाळू नका. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 डायल करा.”
बहस से परहेज़ करें, हमें कॉल करने में नहीं।
किसी भी आपात स्थिति में 112 डायल करें। #DialUP112 pic.twitter.com/5R8Zuqdlt6— UP POLICE (@Uppolice) May 2, 2023
आता यूपी पोलिसांचे हे ट्वीट नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरं तर, सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यात शाब्दिक वाद पाहायला मिळाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. आधी गंभीरने विराटशी बोलणाऱ्या लखनऊच्या खेळाडूला आपल्याकडे खेचले आणि विराटपासून वेगळे केले. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात विराट आणि गंभीर बाचाबाची करताना दिसत आहेत.
विराटने बोललेल्या कोणत्यातरी वक्तव्यावर लखनऊचा मार्गदर्शक गंभीर नाराजी व्यक्त करताना दिसला. त्यानंतर लखनऊचे खेळाडू गंभीरला रोखण्यासाठी पुढे सरसावले. त्यानंतर विराटनेही सोशल मीडियावर एक नोट सोशल मीडियावर शेअर केली.
दंडाची कारवाई
मात्र, विराट आणि गंभीर दोघांवर आयपीएल आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावला गेला. तसेच, लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen ul Haq) याच्यावर सामना शुल्काच्या 50 टक्के दंड लावला गेला. दुसरीकडे युजर्स या दोघांच्या फोटोंवर मीम्स बनवून व्हायरल करत आहेत. तसेच, काहींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (ipl 2023 up police reaction on virat kohli and gautam gambhir viral video see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंड्याने उचलली दिल्लीविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी; शमीच्या गोलंदाजीवर म्हणाला, ‘मला दु:ख होतंय…’
‘माझं पेट्रोल संपलेलं…’, भेदक गोलंदाजीनंतर असं का म्हणाला शमी?