जगभरातील सर्वात लोकप्रिय टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचाही समावेश होतो. या आयपीएल स्पर्धेच्या 16व्या हंगामासाठी मिनी लिलाव पार पडला आहे. तसेच, बीसीसीआयनेही जिओला प्रेक्षकांना चांगल्या सुविधा देण्याची मंजुरी दिली आहे. खरं तर, बीसीसीआयने जिओ नेतृत्वातील स्पोर्ट्स 18ला 4K व्हिडिओमध्ये आयपीएल 2023 स्पर्धेतील सामन्यांचे प्रसारण करण्याची मंजुरी दिली आहे.
असे म्हटले जाते की, 4K रिझोल्युशन असणारा हाय डेफिनिशन व्हिडिओ 1080 एचडी व्हिडिओपेक्षाही चांगला असतो. अशात चाहत्यांना आयपीएलचे सामने आणखी चांगल्या प्रकारे पाहता येतील. खरं तर, सन 2022पर्यंत हॉटस्टार हे आयपीएलचे अधिकृत डिजिटल पार्टनर होते. हॉटस्टार आयपीएल सामन्यांचे प्रसारण एचडीमध्ये करत होते. मात्र, आता लवकरच जिओ 4K रिझोल्युशन (Jio 4K Resolution) सुविधेबाबत अधिकृत घोषणा करेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
माध्यमांतील वृत्तांंनुसार, जिओने 4Kमध्ये फीफा सामन्यांचे प्रसारण केल्याचा दावा आहे. एका वरिष्ठ माध्यम नियोजकाने म्हटले की, “फीफा जिओसाठी एक शिकण्याचा अनुभव होता. मागील दोन महिन्यात त्यांनी सातत्याने तांत्रिक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचे काम केले आहे. तसेच, आयपीएलदरम्यान उच्च दर्जाचा अनुभव देण्याची अपेक्षा आहे..”
जिओ आयपीएल 2023ची स्ट्रीमिंग 16 ते 17 भाषेत
यावेळी आयपीएल 2023 सामन्यांची स्ट्रीमिंग भारतभरात 16 ते 17 भाषांमध्ये केली जाईल. यामध्ये बंगाली, तमिळ, तेलुगू आणि ओडियासह इतर भाषांचाही समावेश आहे. अशात भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील लोकांना आयपीएल सामने पाहताना भाषेबाबत कोणतीही तक्रार नसेल. तसेच, चाहते आयपीएल स्पर्धेचा भरभरून आनंद घेऊ शकतील.
फ्रीमध्ये जिओ ऍपवर मोफत पाहता येईल आयपीएल 2023ची लाईव्ह स्ट्रीमिंग (IPL 2023 Live Streaming)
नुकतेच स्पोर्स्ट 18ने जिओ ऍपवर आयपीएलचे सामने मोफत स्ट्रीम केले जाणार असल्याची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटले होते की, 500 मिलियनहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची योजना आहे.
आयपीएल 2023-2027 साठी वायकॉम 18 कंपनीने डिजिटल हक्क तब्बल 23758 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत. आता 4K रिझोल्युशनमध्ये (4K Resolution) आयपीएल सामने पाहता येणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (ipl 2023 update live streaming bcci approves jio now all ipl matches will be streamed in 4k video know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये पास झाला पठ्ठ्या
न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात एकटा गिल सर्वांना पुरून उरला; 6 डावात ठोकल्या 500पेक्षा जास्त धावा, बाकीचे…