---Advertisement---

उलटी पॅन्ट घालून रिद्धिमान साहा मैदानात, जाणून घ्या का घडला हास्यास्पद प्रकार

Wriddhiman Saha
---Advertisement---

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने 56 धावांनी विजय मिळवला. उभय संघांतील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. शुबमन गिल आणि रिद्धिमान साहा गुजरातसाठी मॅच विनर ठरले. साहाने या सामन्यात 81 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनऊ संघ मैदानात आला तेव्हा एक हास्यास्पद प्रकार पाहायला मिळाला. साहा यावेळी आपली पॅन्ट उलटी घालून आल्याचे पाहायला मिळाले.

लखनऊने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सने 2 विकेट्सच्या नुकसानावर 227 धावा कुटल्या. पहिल्या विकेट्ससाठी रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्यात 142 धावांची भागीदार पार पडली. साहाने 43 चेंडूत 81 धावा कुटल्या आणि शुबमन गिलने 51 चेंडूत 94 धावांचे योगदान दिले. गोलंदाजी विभागातील मोहित शर्मा याचे योगदान देखील गुजरातच्या विजयात महत्वाचे ठरले. मोहितने 4 षटकात 29 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या.

https://twitter.com/nidhi128singh/status/1655181463871168512?s=20

https://twitter.com/shubh_chintak/status/1655181530514292742?s=20

228 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी लखनऊचे फलंदाज मैदानात आले, तेव्ह साहासोबत हा हास्यास्पद प्रकार घटला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि मैदानी पंचांमध्ये इम्पॅक्ट खेळाडूवरून चर्चा सुरू होती. पंचांनी काही कारणास्तव यष्टीरक्षकाच्या रूपात केएस भरतला खेळवण्यास नकार दिला होता. अशात रिद्धिमान साहाला घाईघाईत मैदानात हजर व्हावे लागले. याच घाईमध्ये साहाने आपली पॅन्ट उलटी घातली. पुढच्या बाजूने झापलेला भाग मागच्या बाजून दिसत होता. साहाचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. दरम्यान लखनऊच्या फलंदाजीतील दोन षटके झाल्यानंतर साहाने मैदानाबाहेर गेला.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1655182184645545984?s=20

लखनऊसाठी या सामन्यात सलामीवीर जोडी कायल मेयर्स आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात दिली. कायल मेयर्सने 32 चेंडूत 48 धावा केल्या. तर डी कॉकने 41 चेंडूत 70 धावांची वादळी खेळी केली. लखनऊच्या गोलंदाजी आक्रमानात मोहसिन खान आणि आवेश खान या दोघांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. (Wriddhiman Saha came on the ground wearing the pants the other way around.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहमबादेत लखनऊची धूळधाण, गुजरातच्या 228 धावांचा पाठलाग करताना टाकल्या नांग्या
घरच्या मैदानात राजस्थान ‘टॉस का बॉस’, दोन्ही संघांकडून ‘या’ 2 खेळाडूंचे IPL पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---