चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल 2024च्या पहिल्या सामन्यात विजयी ठरला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून सीएसकेला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 18.4 षटकात आणि 6 विकेट्स राखून सीएसकेने विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड याच्यासाठी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. एमएस धोनी याच्या मार्गदर्शनात आणि ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामातील पहिल्याच सामन्यात बाजी मारली.
174 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी खेळपट्टीवर आल्यानंतर सीएसकेने पहिली विकेट चौथ्याच षटकात गमावली. कर्णधार ऋतुराज गायकवाड वैयक्तिक 15 धावा करून बाद झाला. त्याच्यासोबत सलामीला आलेला रचिन रविंद्र वैयक्तिक 37 धावा करून बाद झाला. अजिंक्य रहाणे वैयक्तिक 27, तर डॅरिल मिचेल 22 धावा करून बाद झाला. शिवम दुबे याने 28 चेंडूत 34*, तर रविंद्र जडेजा याने 17 चेंडूत 25* धावांचे योगदान दिले. आरसीबीसाठी कॅमरून ग्रीन यायने 2 विकेट्स घेतल्या. तर कर्ण शर्मा आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
CSK HAVE BEEN UNDEFEATED AGAINST RCB AT THE CHEPAUK STADIUM FOR THE 16TH CONSECUTIVE YEAR…!!!! 🤯🔥 pic.twitter.com/eCPLJXQ1ma
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 22, 2024
CSK vs RCB at Chepauk in IPL:
– RCB won in 2008.
– CSK won in 2010.
– CSK won in 2011.
– CSK won in 2011.
– CSK won in 2012.
– CSK won in 2013.
– CSK won in 2015.
– CSK won in 2019.
– CSK won in 2024. pic.twitter.com/fh5P2ev8kU— Johns. (@CricCrazyJohns) March 22, 2024
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 6 विकेट्सच्या नुकसानावर 173 धावा केल्या होत्या. यात अनुज रावत याने सर्वाधिक 48, तर दिनेश कार्तिक याने 38* धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. त्याआधी कर्णधार फाफ डू प्लेसिस 35, तर विराट कोहली 21 धावा करून बाद झाले होते. रजत पाटिदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शुन्यावर विकेट्स गमावल्या होत्या. कॅमरून ग्रीन याने 18 धावांची खेळी केल्यानंतर विकेट गमावली होती. सीएसकेसाठी मुस्तफिजूर रहमान याने 4 षटकात 29 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. दीपक चाहर यालाही 4 षटकात 37 धावा खर्च केल्यानंतर एक विकेट मिळाली.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग 11 :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे,समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, दीपक चहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान.
रॉयल चॅलेंजर बंगळुरू प्लेइंग 11 :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा.
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत पालघर संघाचा तिसरा विजय, तर मुंबई शहराचा चौथा पराभव
प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाचा विजयी चौकार