---Advertisement---

पॅरिसमध्येही एमएस धोनीची क्रेझ! चाहता भेटता क्षणीच पडला पाया

On: मंगळवार, जून 11, 2024 3:56 PM
MS Dhoni
---Advertisement---

आयपीएल 2024 चा हंगाम संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. धोनी पॅरिसमध्ये फिरायला गेला आहे. तेथील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. धोनी पॅरिसमध्ये फिरायला गेला असताना तेथील एक चाहता धोनीला भेटला. त्यानं धोनीचे चरणस्पर्श केले आणि तो खूप आनंदी झाल्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी जेव्हा एमएस धोनीनं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, तेव्हा चाहत्यांना वाटलं की तो आता आयपीएलमध्ये खेळणार नाही. परंतु तो आयपीएलचा हा हंगाम खेळला. या हंगामात केवळ धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानात यायचे, कारण हा सीझन त्याचा शेवटचा सीझन असू शकतो.

महेंद्रसिंह धोनी नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 मध्ये शानदार फार्मात होता. कर्णधारपद सोडल्यानंतर मनसोक्त फलंदाजी करताना त्यानं 11 डावांमध्ये 220.54 च्या स्ट्राइक रेटनं 161 धावा ठोकल्या. या हंगामात धोनी डावाच्या शेवटच्या दोन षटकांमध्येच फलंदाजीला यायचा.

एमएस धोनीनं आयपीएल 2025 मध्येही खेळावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. धोनीकडून अद्यापही निवृत्तीबाबत कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

एक पराभव अन् पाकिस्तानचं काम तमाम! कॅनडाविरुद्ध आज ‘करो या मरो’ सामना खेळणार बाबर सेना
या 3 मोठ्या संघांवर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका! अमेरिका अन् अफगाणिस्तान सुपर-8 मध्ये जातील का?
सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पॅरिसला पोहचला ‘माही’! प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर कुटुंबासह काढले फोटो

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---