---Advertisement---

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पॅरिसला पोहचला ‘माही’! प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर कुटुंबासह काढले फोटो

---Advertisement---

कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनीची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते, मग ती खेळाच्या मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर. आयपीएल 2024 संपल्यानंतर धोनी रांची येथील त्याच्या घरी गेला होता. आता तो गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय. नुकताच धोनीचा त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये तो पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर उभा आहे.

महेंद्रसिंह धोनी, त्याची पत्नी साक्षी आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी जिवा नुकतेच फ्रान्समध्ये सुट्टी घालवताना दिसले. हे तिघे पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले असून, हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो एमएस धोनीची मुलगी जिवा धोनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

 

महेंद्रसिंह धोनी नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 मध्ये शानदार फार्मात होता. कर्णधारपद सोडल्यानंतर मनसोक्त फलंदाजी करताना त्यानं 11 डावांमध्ये 220.54 च्या स्ट्राइक रेटनं 161 धावा ठोकल्या. या हंगामात धोनी डावाच्या शेवटच्या दोन षटकांमध्येच फलंदाजीला यायचा.

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी जेव्हा एमएस धोनीनं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, तेव्हा चाहत्यांना वाटलं की तो आता आयपीएलमध्ये खेळणार नाही. परंतु तो आयपीएलचा हा हंगाम खेळला. या हंगामात केवळ धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानात यायचे, कारण हा सीझन त्याचा शेवटचा सीझन असू शकतो.

एमएस धोनीनं आयपीएल 2025 मध्येही खेळावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. धोनीकडून अद्यापही निवृत्तीबाबत कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा; म्हणाला, विश्वचषकानंतर संघातील रहस्य उघड करेन
आयसीसीच्या नियमामुळे झाला बांग्लादेशचा पराभव? पंचांच्या निर्णयानंतर गोंधळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---