एक पराभव अन् पाकिस्तानचं काम तमाम! कॅनडाविरुद्ध आज ‘करो या मरो’ सामना खेळणार बाबर सेना

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 12वा सामना आज (11 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. पाकिस्तान संघाची धुरा बाबर आझमच्या (Babar Azam) हाती आहे. तत्पूर्वी या विश्वचषकात पाकिस्तान संघ विजयाचं खातंही उघडू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या कामगिरीवर आज लक्ष्य राहणार आहे. पाकिस्तानसाठी आज ‘करो या मरो’ सामना आहे.
पाकिस्तान संघ जवळजवळ टी20 विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. परंतु त्यांच्याकडे ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय होण्यासाठी थोड्याफार आशा जिवंत आहेत. पाकिस्तान संघाचा यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिला सामना यजमान अमेरिका संघासोबत झाला. या सामन्यात पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये निराशाजनक पराभव झाला. पाकिस्तानच्या या पराभवाची कोणी अपेक्षादेखील केली नसेल.
पाकिस्तानचा दुसरा सामना भारताविरुद्ध नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यामुळं पाकिस्तानच्या सुपर 8 मध्ये पोहचण्याच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत. पाकिस्तान ग्रुप-अ मध्ये सामाविष्ट आहे. त्या ग्रुप-अच्या गुणतालिकेत भारतीय संघ शीर्ष स्थानी आहे आणि यजमान अमेरिका गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात चार ग्रुप आहेत. चार ग्रुमधून दोनच संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होणार आहेत.
आजच्या सामन्यात पाकिस्तानचा जर कॅनडा संघाकडून पराभव झाला तर पाकिस्तानच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याच्या संपूर्ण आशा स्थगित होणार आहेत. कारण भारत आणि अमेरिकेचे गुणतालिकेत 4-4 गुण आहेत. परंतु पाकिस्तान जर या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी राहिलं तर त्यांना सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी पुढचा सामनादेखील जिंकावा लागेल.
परंतु तरीही पाकिस्तानला सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याची संधी खूप कमी आहे. कारण पाकिस्तानसाठी भारत किंवा अमेरिका या दोन्ही संघांपैकी एका संघानं त्यांचं उर्वरित दोन्ही गमावले तर पाकिस्तान पाकिस्तान सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच पात्र राहिल. परंतु असं होणं खूप अवघड आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पॅरिसला पोहचला ‘माही’! प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर कुटुंबासह काढले फोटो
बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा; म्हणाला, विश्वचषकानंतर संघातील रहस्य उघड करेन