---Advertisement---

IPL 2024 : आकाश चोप्राचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाला ‘MI-GT सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 2:34 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

यंदाच्या आयपीएलचे पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 22 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत 21 सामने होणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. तर गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात चेन्नईत सलामीची लढत होणार आहे. या 17 दिवसांत दिल्ली कॅपिटल, गुजरात टायटन्स आणि बंगळूर हे तीन संघ प्रत्येकी पाच, कोलकता नाईट रायडर्स तीन, तर उर्वरित सहा संघ प्रत्येकी चार साखळी सामने खेळणार आहेत.

याबरोबरच, मुंबई इंडियन्सचे वानखेडे स्टेडियमवरील सामने 11 आणि 17 मार्च रोजी होणार आहेत. तर रात्रीचे सामने 7.30, तर दुपारचे सामने 3.30 वाजता सुरू होतील. अपवाद मात्र सलामीचा सामना हा रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हे हार्दिक पंड्या करणार आहे. रोहित शर्माने गेली 11 वर्ष पलटणचा गाडा सांभाळल्यानंतर आता नेतृत्वाची धुरा ही हार्दिककडे असणार आहे. हार्दिकसमोर पहिल्याच सामन्यात आतापर्यंतच सर्वात मोठं आव्हान असणार आहे. हार्दिक हे आव्हान पेलणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अशातच हार्दिकने मागील 2 आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते, परंतु तो पुन्हा एकदा मुंबई संघाचा भाग बनला आहे. एक क्षण असा होता जेव्हा चाहत्यांनी अहमदाबादच्या मैदानावर हार्दिकचे मनोबल वाढवले ​​होते, परंतु या आयपीएल हंगामात उलटे होऊ शकते. कारण मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याला ट्रोल करण्याचे संकेतही माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने सध्या दिले आहेत.

तसेच मुंबई इंडियन्स या पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल मोहिमेतील आपला सलामीचा सामना हा 24 मार्च रोजी खेळणार आहे. तर अखेरचा चौथा सामना हा 7 एप्रिल रोजी खेळेल. मुंबई या 4 सामन्यांपैकी 2 सामने घरच्या मैदानात आणि 2 प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राऊंडमध्ये खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी 24 मार्च रोजी होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना अहमदाबदमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर हार्दिक पंड्या आपल्या होम ग्राउंडमध्ये होम टीम विरुद्ध खेळणार आहे. तसेच हार्दिकची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली. तसेच तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता हार्दिक आपल्या नेतृत्वात मुंबईला विजयी सुरुवात देणार का, याकडे पलटणचं लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---