भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो मैदानात परतला आहे. सध्या हार्दिक पांड्या डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध गुडघा दुखावल्यामुळे क्रिकेटपासून दूर राहिला होता.
त्यानंतर हार्दिक पंड्याने चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. तर डी.वाय. पाटील ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत हार्दिकने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या रिलायन्स-एक संघाने बीपीसीएल संघाला दोन विकेटने हरवले आहे. यामध्ये हार्दिकने (2/22) अशी गोलंदाजीत चमक दाखवली. त्यामुळे बीपीसीएल संघाला 18.3 षटकांत 126 धावांवर रोखण्यात यश आले होते.
याबरोबरच हार्दिक त्याच्या पहिल्या आयपीएल ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाला आहे की, जेव्हा मी पहिल्यांदा आयपीएलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ झालो तेव्हा मला वाटले की पुरस्कारातून मिळणारे पैसे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी चांगले असतील. तर त्यावेळी मला प्लेअर ऑफ द मॅचचे 10 लाख रुपये मिळाले होते आणि मला वाटले की जे काही रोख बक्षीस आहे ते मला मिळेल. मग मला कळले की रोख बक्षीस संघामध्ये वाटण्यात आले आहे.
तसेच हार्दिक पांड्या 2015 मध्ये पहिला आयपीएल सीझन खेळला होता. यावेळी चेन्नईसोबत झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने 8 चेंडूत 21 धावांची खेळी केली होती. त्यामुळे हार्दिकला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आता पुन्हा एकदा हार्दिक आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. हार्दिक दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता.
Hardik Pandya biggest comeback on the way🔥 pic.twitter.com/Kh9kH6JpGT
— Rohan Gangta (@rohan_gangta) February 20, 2024
दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच गुजरात टायटन्ससाठी दोन हंगाम गाजवल्यानंतर मुंबईने हार्दिकला विकले आहे. आयपीएल लिलावापूर्वी मुंबईने जाहीर केले होते की यावेळी संघाची कमान रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे असलेली पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : स्मृती मंधानाने फोड फोड फोडलं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गुजरातवर दमदार विजय
- अबब..!! टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठे वादळ, अवघ्या 33 चेंडूत झळकावले शतक, भलेभले रेकॉर्ड तोडले