रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात केवळ दोनच सामने जिंकले. आता दुसऱ्या सत्रात संघाने पहिले दोन सामने सलग जिंकले आहेत. यापूर्वी आरसीबीने यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात संघाने गुजरातचा पराभव केला आहे. लीगच्या पाचव्या सामन्यात आरसीबीने गुजरात जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला आणि 45 चेंडू बाकी असताना 108 धावांचे लक्ष्य गाठले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत गुजरातला 107 धावांवर रोखलं. त्यामुळे विजयासाठी मिळालेलं 108 धावांचं आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात स्मृती मंधानाचं वादळ पाहायला मिळालं आहे.
याबरोबरच आरसीबीने या विजयासह आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सलाही मागे टाकले आहे. आताआरसीबीचा संघ महिला प्रीमियर लीगमध्ये सध्या टेबल टॉपर आहे. आरसीबीने आपले दोन्ही सामने जिंकून 4 गुण मिळवले आहेत. तसेच त्याचा नेट रन रेट 1.665 वर देखील सर्वोत्तम आहे. तर त्याचवेळी गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही आपले दोन्ही सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईचा नेट रन रेटही 0.488 आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने दोन सामने खेळले असून प्रत्येकी एक सामना जिंकला आणि हरला आहे. दिल्लीचे 2 गुण आहेत आणि संघ 1.222 च्या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या संघांनी पहिले दोन सामने गमावले आहेत. तसेच या दोन्ही संघांनी आपले खातेही अद्याप उघडलेले नाही.
Make that two wins in a row for Royal Challengers Bangalore! ❤️👏@RCBTweets chase down the target with more than 7 overs to spare 💪
Scorecard 💻📱 https://t.co/wV0BEgckTA#TATAWPL | #RCBvGG pic.twitter.com/ZQL3DTeT0W
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 27, 2024
दरम्यान, या सामन्यात प्रथम खेळताना गुजरात जायंट्स संघाने निराशाजनक फलंदाजी केली आहे. तसेच आरसीबीसाठी रेणुका ठाकूर आणि सोफी मोलिनक्स यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली असून दोघीनी विकेट घेतल्या आणि धावाही दिल्या नाहीत. तर गुजरातने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 107 धावा केल्या. त्यानंतर आरसीबीने 12.3 षटकांत केवळ 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधनाने 43 धावांची शानदार खेळी केली. त्याशिवाय साभिनेनी मेघना 36 धावा करून नाबाद राहिली आणि एलिस पेरी 23 धावा करून नाबाद राहिली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, ली ताहुहू, मेघना सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
महत्वाच्या बातम्या –
- अबब..!! टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठे वादळ, अवघ्या 33 चेंडूत झळकावले शतक, भलेभले रेकॉर्ड तोडले
- कसोटी खेळणार तर मालामाल होणार… बीसीसीआय करणार खेळाडूंच्या पगारात मोठी वाढ? वाचा सविस्तर