इंग्लंड संघाविरुद्ध सलामीचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने विजयाची हॅट्रिक केली आणि यासह पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने खिशात घातली. मायदेशातील टीम इंडियाचा हा सलग 17वा कसोटी मालिका विजय आहे. या मालिका विजयानंतर बीसीसीआयने कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंबाबत एक मोठा निर्णय घेतल्याचे समजते.
समोर आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेतनात मोठी वाढ करणार आहे. तसेच या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार बोनस देखील देण्यात येणार आहे. देशात सध्या रणजी सामने सुरू आहेत. तसेच पुढच्या महिन्यापासून आयपीएल देखील सुरू होणार आहे. आयपीएलसाठी स्वत:ला फिट ठेवता यावे, यासाठी अनेक खेळाडूंनी रणजी करंडकातून माघार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे तरुण खेळाडूंनी कसोटी सामन्यांमधून माघार घेऊ नये म्हणून बीसीसीआयने हे निर्णय घेतल्याचे समजते. ( BCCI is set to increase salary for Test players who play all matches in series )
भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवल्याचे दिसते. कसोटी क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट न खेळता काही खेळाडूंचा आयपीएलवर जास्त फोकस असतो. त्यामुळे कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याबाबात बीसीसीआय विचार करत आहे. त्याशिवाय कसोटी मालिकेचा भाग असणाऱ्या खेळाडूंना बोनसही दिला जाऊ शकतो.
BCCI is set to increase the salary for Test players who play all the matches in the series. [Devendra Pandey From Express Sports] pic.twitter.com/o3KHffIHzk
— Johns. (@CricCrazyJohns) February 27, 2024
सध्या किती मानधन मिळते?
बीसीसीआकडून एका कसोटी सामन्यासाठी खेळाडूंना 15 लाख रुपये दिले जातात. 2016 मध्ये कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार दुप्पट केला होता. दुसरीकडे बीसीसीआयकडून एका वनडे सामन्यासाठी सहा लाख रुपये दिले जातात. तर एका टी 20 सामन्यासाठी 3 लाख रुपयांचं मानधन दिलं जातं. भारतीय खेळाडूंना ग्रेडनुसार वार्षिक पगारही दिला जातो. खेळाडूंचा बीसीसीआय बोर्डासोबत करार असतो.
अधिक वाचा –
– IND vs ENG : भारतीय संघाने इंग्लंडला हरवून भारतीय भूमीवर साकारला सलग 17वा कसोटी मालिका विजय
– IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाला,”युवा…
– IND Vs ENG : रोमहर्षक सामन्यात मालिका भारताच्या खिशात, जाणून घ्या विजयाचे 5 ठळक मुद्दे