---Advertisement---

अरररर! ‘या’ संघाची झाली मोठी चूक, गोंधळ झाला अन् भलताच खेळाडू घेतला विकत

Mallika-Sagar
---Advertisement---

IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठीचा मिनी लिलाव मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत पार पडला. यादरम्यान एक भलताच ड्रामा झाला. पंजाब किंग्स संघाकडून झालेल्या चुकीमुळे त्यांचं सर्वत्र हसू झालं. नावात झालेल्या गल्लतीमुळे त्यांनी एका अशा खेळाडूला खरेदी केले, ज्याला त्यांना निवडायचे नव्हते. चुकीची जाणीव झाल्यानंतर संघमालक  नेस वाडिया आणि प्रीति झिंटा यांनी ऑक्शनर मल्लिका सागर हिला याबाबत सांगितले. मात्र, तोपर्यंत गोष्ट हाताबाहेर गेली होती. पंजाब किंग्सला स्पष्टपणे सांगितले गेले की, आता निर्णयात बदल होऊ शकत नाही.

दुबई (Dubai) येथील आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावादरम्यान ऑक्शनर मल्लिका सागर (Mallika Sagar) हिने शशांक सिंग (Shashank Singh) याचे नाव घेतले. 32 वर्षीय शशांक देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगडकडून खेळतो. तसेच, सनरायझर्स हैदराबादने रिलीज केल्यानंतर आयपीएल 2023मध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र, आयपीएल 2024 (IPL 2024) हंगाम या खेळाडूसाठी नशीब बदलणारा ठरला. चुकून का होईना, तो पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाचा भाग बनला. शशांकला पंजाबने 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले.

शशांकवर बोली लावणारा एकमेव संघ
मजेशीर बाब अशी की, पंजाब किंग्स हा अनकॅप्ड अष्टपैलू अष्टपैलू शशांकवर बोली लावणारा एकमेव संघ ठरला. ऑक्शनर मल्लिका सागरने हॅमर डाऊन करत शशांक पंजाबकडून खरेदी झाल्याचे घोषित केले, तसे चुकीची जाणीव झाल्यानंतर नेस वाडिया (Ness Wadia) आणि प्रीति झिंटा (Preity Zinta) यांनी सांगितले की, त्यांनी वेगळ्या खेळाडूला शशांक समजले होते आणि चुकून या खेळाडूला खरेदी केले. मात्र, ऑक्शनरने स्पष्ट म्हटले की, हा निर्णय आता बदलला जाऊ शकत नाही. तसेच, पंजाब फ्रँचायझी आपल्या निर्णयावरून मागे हटू शकत नाही.

https://twitter.com/Hypercraft58/status/1737178916031508882

शशांकचे प्रदर्शन
शशांक सिंग याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 55 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 20.11च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. तसेच, 28.93च्या सरासरीने गोलंदाजी करताना 15 विकेट्सही घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त अ दर्जाच्या सामन्यांमध्ये त्याने 41.08च्या सरासरीने 986 धावा केल्या आहेत. तसेच, 28.06च्या सरासरीने 33 विकेट्सही घेतल्या आहेत. (ipl 2024 auction franchise punjab kings bought a player which they did not want to buy shashank singh)

हेही वाचा-
IND vs SA । दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा सोपा विजय, भारताच्या आठही गोलंदाजांची धुलाई
IPL Auction 2024: एका ओव्हरमध्ये 5 सिक्स देणाऱ्या गोलंदाजासाठी RCB मोजले तब्बल 5 कोटी, पाहा तो कोण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---