प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीय इंडियन प्रीमियर लीग युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. आयपीएल 2024साठी मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला गेला होता. यात अनेक युवा खेळाडूंवर पशांचा अक्षरशः पाऊस पडला. अनेकांना आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटिंनी जास्त किंमत मिळाली. झारखंड संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळमारा कुमार कुशाग्र याच्यावरही मोठी बोली लागली.
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर सर्वात मोठी बोली लागली. तसेच भारतातील अनेक युवा आणि अनकॅप्ड खेळाडूंवर देखील मोठ्या प्रमाणात पैशा खर्च केला गेला. आयपीएल फ्रँचायझी युवा खेळाडूंची योग्य पारख करून त्यांना आपल्या संघात घेण्याच्या प्रयत्नात दिसल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2024 साठी कुमार कुशाग्र याला तब्बल 7.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
झारखंडचा हा यष्टीरक्षक फलंदाज आयपीएल 2024च्या लिलिवात अनेक संघांच्या निशाण्यावर होता. पण दिल्ली कॅपिटल्सने सर्वात मोठी बोली लावून त्याला खरेदी केले. अवघ्या 19 वर्षांचा कुशाग्र देवधर ट्रॉफीमध्ये सहावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने या स्पर्धेत 227 धावांचे योगदान दिले होते. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कुशाग्रने महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 37 चेंडूत 67* धावांची खेळी केली होती.
Kumar Kushagra is next with a base price of INR 20 Lakh.
He is SOLD to Delhi Capitals for a whopping price of INR 7.2 Crore 🔨💰#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
रणजी क्रिकेटमध्ये कुशाग्रने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी नागालॅन्डविरुद्ध द्विशतक केले होते. या जबरदस्त खेळीच्या जोरावर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 250 धावापेक्षा मोठी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज बनला. (IPL 2024 Auction Kumar Kushagra was bought by Delhi Capitals for Rs 7.20 crore)
महत्वाच्या बातम्या –
IPL Auction 2024 । पंजाबचा प्लॅन फसला! शाहरुख खान गुजरातच्या ताफ्यात
IPL 2024 Auction: वर्ल्डकपमध्ये कहर करणारा घातक वेगवान गोलंदाज ‘पलटण’च्या ताफ्यात, केवढे कोटी केले खर्च?