IPL 2024 Auction: मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2024 लिलावात खेळाडूंवर 5 कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च केले नाहीत. मात्र, ज्या खेळाडूंना ताफ्यात घेतलं, त्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. मुंबईने श्रीलंकेच्या एका अशा खेळाडूला खरेदी केले, ज्याला दुसरा मलिंगा म्हटले जात आहे. खरं तर, अलीकडेच फ्रँचायझीने लसिथ मलिंगा यालाही राजस्थान रॉयल्स संघाकडून आपल्या संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील केले आहे.
कोण आहे दुसरा मलिंगा?
खरं तर, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा (Nuwan Thushara) याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. तुषाराची गोलंदाजी करण्याची ऍक्शन अगदी श्रीलंकेचा माजी दिग्गज आणि मुंबईसाठी अनेक वर्षे खेळणाऱ्या लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याच्याशी मिळती-जुळती आहे. त्यामुळेच नुवानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याला दुसरा मलिंगाही म्हटले जात आहे. तुषाराची बेस प्राईज 20 लाख रुपये होती, पण मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला 4.8 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले.
Nuwan Thushara will be playing for Mumbai Indians.
– Malinga version in MI. pic.twitter.com/xtQdyijyds
— Johns. (@CricCrazyJohns) December 19, 2023
तुषाराची टी20 आकडेवारी
नुवान तुषारा दुसरा मलिंगा (Nuwan Thushara 2nd Malinga) म्हणून ओळखला जात आहे. त्याची आकडेवारी पाहिली, तर त्याने देशासाठी 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6 विकेट्सही नावावर केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 79 टी20 सामने खेळताना 107 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची टी20तील इकॉनॉमी ही 7.71 इतकी आहे. त्याने यादरम्यान 3 वेळा एका डावात 4 विकेट्स, तर 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या यॉर्कर चेंडूंचा मलिंगाप्रमाणेच खतरनाक असल्याचे म्हटले जात आहे.
No such thing as too many Thushara🎯videos to share and watch on loop 🔥🤌#OneFamily #MumbaiIndians #IPLAuctionpic.twitter.com/pRKu01CQBO
— Mumbai Indians (@mipaltan) December 19, 2023
मुंबईने खरेदी केले 4 परदेशी खेळाडू
मुंबई इंडियन्स संघाने या लिलावात 4 परदेशी खेळाडूंवर बोली लावली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज गेराल्ड गोएट्जी याला 5 कोटी रुपयात, श्रीलंकेचा दिलशान मदुशंका याला 4.6 कोटी, तुषाराला 4.8 कोटी आणि मोहम्मद नबीला 1.5 कोटी रुपयात संघात घेतले. याव्यतिरिक्त 4 भारतीय खेळाडूही मुंबईत सामील झाले आहेत. त्यात श्रेयस गोपाळ, शिवालिक शर्मा, नमन धीर आणि अंशुल कंबोज यांचा समावेश आहे. (ipl 2024 auction mumbai indians buys nuwan thushara called as new malinga yorker see viral video )
हेही वाचा-
इतिहास घडला! बांगलादेशी पठ्ठ्याने केली सचिनचा 14 वर्षे जुना Record मोडण्याची डेरिंग
‘रोहितला परत आणा’, म्हणत चाहत्याचा थेट मालक अंबानीलाच प्रश्न; आकाश म्हणाला, ‘चिंता नको करू, तो..’