Mumbai Indians IPL 2024 Squad: आयपीएल 2024 स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत पार पडलेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 8 खेळाडूंवर बोली लावली. या तसेच, खेळाडूंना रिटेन किंवा ट्रेड करण्यात मुंबईने एकूण 82.25 कोटी रुपये खर्च केले होते. पाच वेळच्या चॅम्पियन असलेल्या लिलावात मुंबईने 16.70 कोटी रुपये खर्च केले. त्यांच्याकडे अजूनही 1.05 कोटी रुपये उरले आहेत. त्यांनी विश्वचषकात शानदार प्रदर्शन करणाऱ्या 2 खेळाडूंवर बोली लावली. मुंबईने दक्षिण आफ्रिका संघाचा गेराल्ड कोएट्जी आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका यांना ताफ्यात जोडले.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने गेराल्ड कोएट्जी (Gerald Coetzee) याच्यासाठी 5 कोटी रुपये खर्च केले. तसेच, दिलशान मदुशंका याला 4.60 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले. मदुशंकाने नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात 9 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, कोएट्जीने 8 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या होत्या. स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मदुशंका तिसऱ्या, तर कोएट्जी पाचव्या स्थानी होता. याव्यतिरिक्त मुंबईने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा (Nuwav Thushara) याच्यासाठी 4.80 कोटी रुपयेही खर्च केले. त्याची गोलंदाजी ऍक्शन संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा याच्याशी मिळती-जुळती आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1737162635370770542
मुंबईने नबीवर लावली बोली
मुंबईने यावेळी अफगाणिस्तान संघाचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी यालाही त्याच्या बेस प्राईज 1.50 कोटी रुपयात संघात घेतले. याव्यतिरिक्त फ्रँचायझीने 4 भारतीय खेळाडूंनाही त्यांच्या बेस प्राईज 20 लाखात संघाचा भाग बनवले. त्यात फिरकीपटू श्रेयस गोपाळ, तसेच अष्टपैलू शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज आणि नमन धीर यांचा समावेश आहे.
मुंबईने रिटेन केलेले खेळाडू
हार्दिक पंड्या (कर्णधार/ट्रेड करून घेतला), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड
लिलावात खरेदी केलेले खेळाडू
गेराल्ड कोएट्जी (5 कोटी रुपये), दिलशान मदुशंका (4.6 कोटी रुपये), नुवान तुषारा (4.80 कोटी रुपये), मोहम्मद नबी (1.50 कोटी रुपये), श्रेयस गोपाल (20 लाख रुपये), शिवालिक शर्मा (20 लाख रुपये), अंशुल कंबोज (20 लाख रुपये), नमन धीर (20 लाख रुपये).
मुंबई इंडियन्स स्क्वॉड (Mumbai Indians Squad)
सलामी फलंदाज- रोहित शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक)
मधली फळी- सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, नेहाल वढेरा, विष्णू विनोद (यष्टीरक्षक)
अष्टपैलू- हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, नमन धीर
वेगवान गोलंदाज- जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडोर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, गेराल्ड कोएट्जी, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा
फिरकीपटू- पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, श्रेयस गोपाल.
हेही वाचा-
‘रोहितला परत आणा’, म्हणत चाहत्याचा थेट मालक अंबानीलाच प्रश्न; आकाश म्हणाला, ‘चिंता नको करू, तो..’
टेन्शन नाही! मुंबई इंडियन्सला मिळाला नवा मलिंगा, विरोधी टीमसाठी धोक्याची घंटी; पाहा व्हायरल Video






