जगभरात सर्वाधिक पाहिली जाणारी टी20 स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. आयपीएल स्पर्धेत खेळून अनेक खेळाडूंनी आपली कारकीर्द शिखरावर नेली आहे. आयपीएल 2024 रिटेन्शन पार पडले आहे. तसेच, आयपीएल संघांनी रिलीज आणि रिटेन्शनची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलकडे सोपवली आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. भारताबाहेर आयपीएल लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यावेळी तब्बल 1166 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. चला तर, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात…
लिलावात किती भारतीयांचा समावेश?
आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात एकूण 1166 खेळाडूंनी (1166 players for IPL 2024 auction) आपली नावे दिली आहेत. लिलावासाठी यावेळी 830 भारतीय खेळाडूंनी आपले नाव दिले आहे. याव्यतिरिक्त 336 परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. यातील 212 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. तसेच, सहयोगी देशाचे 45 खेळाडूही सामील आहेत. लिलावासाठी नोंदणी करणाऱ्या एकूण 25 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली आहे.
किती भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंची 2 कोटी बेस प्राईज?
ऑस्ट्रेलियाच्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) विजेत्या संघातील 7 खेळाडू त्या 25 खेळाडूंमध्ये सामील आहेत, ज्यांनी 2 कोटी रुपये बेस प्राईजसह आयपीएल 2024 लिलावात उतरणार आहेत. यामध्ये पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस आणि सीन ऍबॉट यांचाही समावेश आहे. 2 कोटींच्या बेस प्राईजमध्ये फक्त 4 भारतीय सामील आहेत. यामध्ये उमेश यादव, केदार जाधव, शार्दुल ठाकूर आणि हर्षल पटेल यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, विश्वचषक 2023मध्ये न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र याने आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने 578 धावा करत 5 विकेट्सही नावावर केल्या होत्या. त्याने आयपीएल 2024 लिलावासाठी (IPL 2024 Auction) आपली बेस प्राईज 50 लाख रुपये ठेवली आहे.
दोन कोटी रुपये बेस प्राईज ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी
हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, सीन ऍबॉट, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजुर रहमान, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेविड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, गेराल्ड कोएट्जी, रिले रुसो, रासी व्हॅन डर ड्युसेन, अँजेलो मॅथ्यूज (IPL 2024 auction which Indian cricketer’s base price is Rs 2 crore from kedar jadhav these are the names)
हेही वाचा-
अय्यर संघात असतानाही ऋतुराज गायकवाडला केले उपकर्णधार, BCCI ट्रोल
भारतात खेळलेल्या सगळ्या क्रिकेटपटूंचा टी20 रेकॉर्ड मराठमोळ्या ऋतूराज गायकवाडने मोडला, पाहा विक्रम