बीसीसीआयने गुरुवारी 22 फेब्रुवारीला आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा हा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. वेळापत्रकात एक गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. ती म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघ आपले पहिले दोन घरचे सामने विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
याबरोबरच दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना हा 23 मार्चला पंजाब किंग्जविरूद्ध होत आहे. तसेच हा सामना मोहालीत होणार आहे. तर दिल्लीचा दुसरा सामना हा राजस्थान रॉयल्सविरूद्ध जयपूरमध्ये 28 मार्चला होणार आहे. तर 31 मार्चला चेन्नईविरूद्ध विशाखापट्टणममध्ये होणार आहे. तसेच 3 एप्रिलला देखील दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. हा सामना केकेआर विरूद्ध होईल. तसेच 7 एप्रिलला दिल्ली अन् मुंबई वानखेडेवर भिडणार आहेत.
Major updates by Delhi Co-Owner for IPL 2024. [Espn Cricinfo]
– Pant will lead Delhi Capitals.
– Pant will play as a batter in the first half of the season.
– Nortje is fit.
– Jhye Richardson is unavailable for the initial part.
– Harry Brook set to bat at 6. pic.twitter.com/k8xdY5YJw1— Johns. (@CricCrazyJohns) February 23, 2024
मात्र, त्याआधीच संघाच्या वेगवान गोलंदाजीला मोठा फटका बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जे रिचर्डसन आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. पण दुखापतीमुळे तो पहिल्या हाफ मधून बाहेर झाला आहे. याबाबत दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला माहिती दिली आहे. तसेच यावेळी आयपीएल 2024 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने जे रिचर्डसनला 5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
तसेच झाय रिचर्डसन 2021 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना पहायला मिळाला होता. त्यानंतर तो दोन सीझन आयपीएलमधून गायब झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिचर्डसन आयपीएलमध्ये येणार होता. त्याआधी टी-20 लीग बिग बॅश लीगमध्ये रिचर्डसनची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. जे रिचर्डसनने बिग बॅश लीगमध्ये 70 सामन्यांत 94 बळी घेतले आहेत. मात्र, दुखापतीमुळे रिचर्डसन बराच काळ बाहेर आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आपला एकही सामना होम ग्राऊंड अरूण जेटली स्टेडियमवर खेळणार नाहीये. त्यामुळे ऋषभ पंतचे पुनरागमन हे दिल्लीत नाही तर मोहालीत होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियम यावेळी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. कारण अरूण जेटली स्टेडियमवर वुमन प्रीमियर लीगचा अंतिम सामना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –






