आयपीएल 2024 च्या 39व्या सामन्यात आज ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपर किंग्ज समोर केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. मैदानावर थोडं दव आहे. त्याचा प्रभाव पडेल. विकेट थोडी संथ आहे. आशा आहे की आम्ही त्यांच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवू शकू. आम्हाला माहित आहे की चेन्नईची परिस्थिती आव्हानात्मक आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड – नाणेफेक ही अशी गोष्ट आहे ज्यावर मला काम करण्याची गरज आहे. नंतर थोडं दव पडेल, परंतु विकेट तुम्हाला आश्चर्यचकितही करू शकते. तुम्हाला फक्त प्रत्येक क्षेत्रात स्वतःला व्यक्त करण्याची गरज आहे. आमच्या संघात एक बदल. रचिन रवींद्रच्या जागी डॅरिल मिशेल येतोय. आम्ही प्रथम फलंदाजी करत आहे की गोलंदाजी यानं काही फरक पडत नाही,
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – देवदत्त पडिक्कल, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर
या आधीच्या सामन्यात लखनऊकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नईला आता घरच्या मैदानावर बदला घेण्याची संधी असेल. सीएसकेला गुणतालिकेत अव्वल 4 मध्ये राहायचं असेल तर हा सामना जिंकावाच लागेल. चेन्नईनं आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. संघ गुणतालिकेत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्ससाठी या सामन्यात बरंच काही पणाला लागणार आहे. त्यांचेही चेन्नईप्रमाणे 7 सामन्यांत 8 गुण असून रन रेटमुळे ते 5व्या स्थानावर आहेत. आता राहुलची टीम धोनीच्या चाहत्यांसमोर काय कमाल करू शकते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI च्या अधिकाऱ्यांचा पगार किती असतो? वर्षाची कमाई किती? आकडेवारी जाणून बसेल धक्का!
‘या’ 8 खेळाडूंचं टी20 विश्वचषक संघात स्थान निश्चित, आयपीएलमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी
धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालचं तुफानी शतक, राजस्थानचा मुंबईवर खूप मोठा विजय