क्रिकेटटॉप बातम्या

BCCI च्या अधिकाऱ्यांचा पगार किती असतो? वर्षाची कमाई किती? आकडेवारी जाणून बसेल धक्का!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयची आयपीएलमधून भरपूर कमाई होते. आयपीएलमुळे खेळाडूंनाही मोठी कमाई करण्याची संधी मिळते. अनेकदा खेळाडूंच्या पगाराची माहिती समोर येत असते. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा पगार फारच कमी लोकांना माहीत असतो. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या पगाराबद्दल माहिती देतो.

बीसीसीआय हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते जय शाह यांचं चित्र. ते बोर्डाचे सचिव आहेत. मात्र त्यांच्या बरोबर इतरही अनेक महत्त्वाची माणसं बोर्डावर काम करतात. माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष असून राजीव शुक्ला उपाध्यक्ष आहेत. तर आयपीएलची धुरा अरुण धुमाळ यांच्या खांद्यावर आहे.

GQ वर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना वर्षाला सुमारे 5 कोटी रुपये पगार मिळतो. रिपोर्टनुसार, माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा पगारही तेवढाच होता. तसेच अन्य अधिकाऱ्यांनाही मोठी रक्कम मिळते. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मासिक पगार मिळत नाही. उलट त्यांना दररोजचा भत्ता मिळतो. अहवालानुसार, बोर्डाच्या सर्व सदस्यांना एका बैठकीसाठी दररोज 40 हजार रुपये मिळतात. हा भत्ता आयपीएल अध्यक्षांनाही लागू असतो.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा पगार किती आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो, जय शाह यांच्या पगाराबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अहवालानुसार त्यांनाही रोजचा भत्ता मिळतो. तसेच परदेश दौऱ्यावर गेल्यास या भत्त्यामध्ये वाढ होते. या सोबतच प्रवासासाठी बिझनेस क्लासचं तिकीटही उपलब्ध असतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी20 विश्वचषकासाठी रोहित ब्रिगेड सज्ज! प्रोमो रिलीज; देशभक्तीपर गाणं ऐकून तुम्हीही हरवून जाल!

मोहम्मद रिझवानची तुलना चक्क डॉन ब्रॅडमनशी! पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वेड्यासारखा दावा, चाहते करतायेत तुफान ट्रोल

‘या’ 8 खेळाडूंचं टी20 विश्वचषक संघात स्थान निश्चित, आयपीएलमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी

Related Articles