---Advertisement---

मोहम्मद रिझवानची तुलना चक्क डॉन ब्रॅडमनशी! पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वेड्यासारखा दावा, चाहते करतायेत तुफान ट्रोल

---Advertisement---

पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं अलीकडेच आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विश्वविक्रम केला. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि बाबर आझम सारख्या दिग्गज खेळाडूंना पछाडलं आहे.

रिझवानच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याच्या अभिनंदनाचा ओघ सुरू झाला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनंही रिझवानचं अभिनंदन केलं. मात्र आता त्याचं अभिनंदन करणं आफ्रिदीला महागात पडलंय. कारण त्यानं अभिनंदन करताना रिझवानची तुलना चक्क सर डॉन ब्रॅडमनशी केली! यावरून चाहते आता शाहीन आफ्रिदीला प्रचंड ट्रोल करत आहेत.

मोहम्मद रिझवानचं अभिनंदन करताना शाहीन आफ्रिदीनं ‘X’ वर पोस्ट केलं की, “टी20 क्रिकेटचा ब्रॅडमन आणि पाकिस्तानचा सुपरमॅन मोहम्मद रिझवान, टी20 क्रिकेटमध्ये 3000 धावा केल्याबद्दल तुझं अभिनंदन! तुझ्यामुळे या खेळात बदल घडला आहे. असंच खेळत राहा चॅम्प! तु अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेस.”

शाहीन आफ्रिदीच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही चाहत्यांनी कमीत कमी चेंडूत 3000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची आकडेवारी दाखवत आफ्रिदीला आरसा दाखवला. तर काहींनी मोहम्मद रिझवानला टी20 मधील कसोटी खेळाडू म्हटलं. तुम्ही या पोस्ट येथे पाहू शकता.

 

 

मोहम्मद रिझवानबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 93 सामन्यांच्या 80 डावांमध्ये 49.16 च्या सरासरीनं 3048 धावा केल्या आहेत. मात्र या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट फारच कमी राहिला. रिझवाननं 3048 टी20 धावा फक्त 127.42 च्या स्ट्राइक रेटनं केल्या आहेत. हा स्ट्राईक रेट पाकिस्तानसाठी किमान 50 सामने खेळलेल्या खेळाडूंच्या यादीतील हरिस रौफ आणि इमाद वसीमसारख्या गोलंदाजांपेक्षाही वाईट आहे.

सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, ही 5 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर पाकिस्ताननं मालिकेतील दुसरा सामना जिंकला. यानंतर पाहुण्या संघानं तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ 8 खेळाडूंचं टी20 विश्वचषक संघात स्थान निश्चित, आयपीएलमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी

मुंबईविरुद्ध 5 विकेट घेणारा संदीप शर्मा लिलावात राहिला होता अनसोल्ड! शेअर केली भावूक स्टोरी

धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालचं तुफानी शतक, राजस्थानचा मुंबईवर खूप मोठा विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---