---Advertisement---

‘या’ 8 खेळाडूंचं टी20 विश्वचषक संघात स्थान निश्चित, आयपीएलमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी

---Advertisement---

आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असेल? कोणत्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळेल?, याबाबत बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आधीच संकेत दिले आहेत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी20 विश्वचषकाच्या संघात प्राधान्य दिलं जाईल, असं ते म्हणाले होते.

आयपीएलच्या या हंगामात अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं छाप पाडली आहे. मात्र ज्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली त्या खेळाडूंवर आपण एक नजर टाकूया. हे खेळाडू 2024 च्या टी-20 विश्वचषकात खेळतील हे जवळपास निश्चित आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी सातत्यानं उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. रोहितनं आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात 43.29 च्या सरासरीनं 303 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. या हंगामात विराट कोहलीची बॅट देखील चांगलीच तळपत आहे. त्यानं 8 सामन्यात 63.17 च्या सरासरीनं 379 धावा केल्या असून, तो ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे.

सोमवारी, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालनं नाबाद शतक झळकावून टी20 विश्वचषकासाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. या सामन्यापूर्वी तो खराब फॉर्मशी झुंजत होता. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकून त्यानं सर्व टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

उर्वरित खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी कर्णधार ऋषभ पंत आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही तुफान फार्मात आहे. तो ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर आहे. तसेच मधल्या फळीत सूर्यकुमार यादवही सातत्यानं धावा गोळा करत आहे.

फिरकीपटू कुलदीप यादवनं या हंगामात आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. तो त्याच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बनला असून त्याची निवडही जवळपास निश्चित आहे. गोलंदाजीशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा फलंदाजीतही आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलाय. जडेजानं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध कठीण परिस्थितीत चांगली खेळी खेळली होती. त्यामुळे त्याला टी20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळेल, हे निश्चित आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईविरुद्ध 5 विकेट घेणारा संदीप शर्मा लिलावात राहिला होता अनसोल्ड! शेअर केली भावूक स्टोरी

धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालचं तुफानी शतक, राजस्थानचा मुंबईवर खूप मोठा विजय

छोटा पॅकेट, मोठा धमाका! राजस्थानविरुद्ध संकटमोचक बनून आला तिलक वर्मा, ठोकलं झंझावाती अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---