---Advertisement---

टी20 विश्वचषकासाठी रोहित ब्रिगेड सज्ज! प्रोमो रिलीज; देशभक्तीपर गाणं ऐकून तुम्हीही हरवून जाल!

t20 world cup trophy
---Advertisement---

देशात सध्या आयपीएल 2024 ची धूम आहे. आणखी एक महिना चाहत्यांना या लीगचा थरार अनुभवता येणार आहे. त्यानंतर जूनमध्ये लगेच टी20 विश्वचषक आयोजित केला जाईल. 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी होणार असून 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये हा सामना खेळला जाईल. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असले. या मेगा स्पर्धेसाठी भारताचा संघ येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी स्टार स्पोर्ट्सनं एक प्रोमो व्हिडिओ रिलीज केला.

हा प्रोमो टी20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी भारतीय संघासाठी असून व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरम हे गाणे वाजत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या या प्रोमो व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा दिसत आहेत. हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तुम्ही हा प्रोमो येथे पाहू शकता.

 

टी20 विश्वचषक 2024 मध्ये भाग घेणारे संघ – यूएसए, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा.

टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक

5 जून 2024 – भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क

9 जून 2024 – भारत विरुद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क

12 जून 2024 – भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क

15 जून 2024 – भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा

टी20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संभाव्य संघ –

रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान

महत्त्वाच्या बातम्या – 

मोहम्मद रिझवानची तुलना चक्क डॉन ब्रॅडमनशी! पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वेड्यासारखा दावा, चाहते करतायेत तुफान ट्रोल

‘या’ 8 खेळाडूंचं टी20 विश्वचषक संघात स्थान निश्चित, आयपीएलमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी

मुंबईविरुद्ध 5 विकेट घेणारा संदीप शर्मा लिलावात राहिला होता अनसोल्ड! शेअर केली भावूक स्टोरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---