आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात दोन असे संघ आमनेसामने आहेत ज्यांनी हंगामाची सुरुवात शानदार विजयानं केली. या दोन्ही संघांचे कर्णधार नवखे आहेत. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात एका संघाला पराभवाची चव चाखावी लागेल. गतविजेत्या चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. तर गतवेळचे उपविजेते गुजरातचं नेतृत्व शुबमन गिलकडे आहे.
गिल आणि गायकवाड हे दोन्ही सलामीचे फलंदाज त्यांच्या कलात्मक फलंदाजीसाठी ओळखले जातात. मात्र आज सर्वांचे लक्ष त्यांच्या व्यूहात्मक कौशल्याकडे असेल. पहिला सामना जिंकल्यानंतर विजयाची घोडदौड कायम राखण्याचं त्यांचं लक्ष्य असेल. अनुभवी महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलपूर्वीच ऋतुराजकडे कर्णधारपद सोपवलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध त्यानं आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवली होती.
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर कर्णधारपद स्वीकारणाऱ्या गिलनंही आपल्या नव्या भूमिकेत चांगली कामगिरी केली. त्यानं मुंबईविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गिल सध्या 24 वर्षांचा असून तो आयपीएलमधील सर्वात तरुण कर्णधार आहे. त्याच्या मदतीला मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा, जो रणनीतिक कौशल्यांमध्ये पारंगत आहे तसेच अनुभवी डेव्हिड मिलर आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहेत.
दुसरीकडे, ऋतुराजच्या मागे करिष्माई धोनीचा हात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा 6 गडी राखून शानदार पराभव केला होता. मात्र या सामन्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं बऱ्याच धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्या जागी शार्दुल ठाकूर आणि मुकेश कुमार हे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. चेन्नईसाठी चांगली गोष्ट म्हणजे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमाननं पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली.
चेन्नई आपल्या फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल करण्याची शक्यता नाही. दुसरीकडे गुजरात टायटन्सला सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचं मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आलं नाही. मात्र, त्याच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे संघाला सामना जिंकण्यात यश आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटचा थरार वाढणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच सामने खेळले जाणार
विराट कोहलीनं रचला आणखी एक इतिहास, सुरेश रैनाचा जुना विक्रम मोडला
विराट कोहलीला भेटण्यासाठी काहीही! मैदानाची सुरक्षा मोडून चाहता थेट क्रीजवर, पाहा VIDEO