आयपीएल 2024च्या 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्लीनं गुजरातवर 4 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, गुजरातची टीम 8 गडी गमावून 220 धावाच करू शकली.
गुजरात टायटन्ससाठी डेव्हिड मिलरनं तुफानी फटकेबाजी केली. तो 23 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. त्यानं 6 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले. तो क्रिजवर असेपर्यंत गुजरातच्या विजयाच्या आशा कायम होत्या, मात्र तो 18व्या षटकात बाद झाला आणि गुजरातच्या विजयाच्या आशा मावळल्या. मुकेश कुमारनं मिलरची विकेट घेतली.
मुकेश कुमारनं अखेरच्या षटकात 19 धावा डिफेंड केल्या. शेवटच्या षटकात राशिद खानंनं 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. गुजरातला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची आवश्यकता होती. मात्र राशिद खान संघाला विजयापर्यंत पोहचवू शकला नाही.
गुजरातसाठी साई सुदर्शननं 39 चेंडूत 65 धावा केल्या. त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋद्धिमान साहानं 25 चेंडूत 39 धावाचं योगदान दिलं. गुजरातचे इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. दिल्लीसाठी कुलदीप यादवनं शानदार गोलंदाजी करताना 2 विकेट घेतल्या. त्यानं आपल्या 4 षटकांत केवळ 29 धावा दिल्या.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतनं 43 चेंडूत 88 धावांची विस्फोटक खेळी खेळली. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. तर अक्षर पटेलनं 43 चेंडूत 66 धावांचं योगदान दिलं. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सनं शानदार फलंदाजी करत 7 चेंडूत 26 धावा ठोकल्या. दिल्लीसाठी ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यात अवघ्या 68 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली.
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, संदीप वारियर सर्वात यशस्वी ठरला. त्यानं दिल्लीच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवलं. याशिवाय नूर अहमदला 1 विकेट मिळाली. मोहित शर्मानं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी गोलंदाजी टाकली. त्यानं 4 षटकात 73 धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
गुजरात टायटन्स – ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर
इम्पॅक्ट प्लेअर्स – शरथ बीआर, साई सुदर्शन, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अॅनरिक नॉर्किया, खलिल अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुमित कुमार, रसिक दार सलाम, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यानं आतापर्यंत केल्या ‘या’ 4 मोठ्या चुका, जाणून घ्या सविस्तर