आयपीएल 2024 च्या 64व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स समोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान
इम्पॅक्ट प्लेअर्स – मणिमारन सिद्धार्थ, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौथम
दिल्ली कॅपिटल्स – अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, रिषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, प्रवीण दुबे, स्वस्तिक चिकारा, ललित यादव
लखनऊच्या संघासाठी प्लेऑफचा मार्ग अजूनही अवघड आहे. प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. इथून पुढे लखनऊनं त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर ते 16 गुणांवर पोहोचतील. यानंतर त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशाही वाढतील.
आजच्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलवरही सर्वांची नजर असेल. गेल्या काही सामन्यांत स्लो फलंदाजीमुळे तो टिकाकारांचं लक्ष्य बनला आहे. आज तो आपल्या बॅटनं या सर्व टिकेला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सनं आरसीबीविरुद्ध शेवटचा सामना गमावल्यानंतर स्वतःसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. एका सामन्याच्या बंदीमुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत या सामन्यात खेळू शकला नव्हता. आजच्या सामन्यात तो परतला आहे. पंतच्या सेनेला आजचा सामना जिंकून किमान 14 गुण गाठायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
18 मे शी विराट कोहलीचं जुनं नातं, या दिवशी चेन्नईचा बँड वाजणार हे निश्चित!
पावसामुळे सामना रद्द, चाहत्यांचे पैसे मिळणार परत; गुजरात टायटन्स संघाची घोषणा





